शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Education: इयत्ता पहिली ते आठवीसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 9:38 AM

Education News: कोरोनाच्या काळात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येतील, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.

मुंबई : कोरोनाच्या काळात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येतील, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.कोरोना काळात मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी विशेष अडचण येत असल्याने ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी सरकारला पर्याय शोधण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड आणि अनमप्रेम यांनी  उच्च न्यायालयात दाखल केली  आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.

विशेष विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व समर्पित शैक्षणिक वहिनी सुरू करण्याची व रेडिओवर टॉक शो घेण्याची सूचना गेल्या आठवड्यात न्यायालयाने सरकारला केली होती. गुरुवारच्या सुनावणीत सरकारी वकील रीना साळुंके यांनी न्यायालयाला सांगितले की, डीडी सह्याद्रीवर ज्ञानगंगा म्हणून शैक्षणिक कार्यक्रम चालविण्यात येतो. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी हा कार्यक्रम केवळ इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून, बधिर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी नसल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. 

वेळ निश्चित करण्यास सांगितले सामाजिक न्याय विभागाने दूरदर्शनला बधिर विद्यार्थ्यांसाठी एक वेळ निश्चित करण्यास सांगितले आहे, तसेच शिक्षण विभाग इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी अशाचप्रकारे शैक्षणिक कार्यक्रम एका महिन्यात सुरू करणार आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणMumbaiमुंबई