शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

इंजिनीअरिंग प्रवेशाचा रेकॉर्ड; तब्बल १.४० लाख विद्यार्थ्यांची नोंद, आणखी वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 6:19 AM

पुढील दोन दिवसांत प्रवेश आणखी वाढण्याची शक्यता

अमर शैलामुंबई : राज्यात इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना यंदा सुगीचे दिवस आले असून यंदा इंजिनीअरिंग शाखेच्या विविध अभ्यासक्रमांना विक्रमी अशा १ लाख ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यातून इंजिनीअरिंगच्या जवळपास ७८ टक्के जागा भरल्याचे सीईटी सेलच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तसेच संस्था पातळीवरील प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरू असून, पुढील काही दिवसांत यात वाढीची शक्यताही वर्तविली जात आहे. 

राज्यात यंदा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या विविध कोट्यांतून एकूण १ लाख ७९ हजार ८७७ हजार उपलब्ध आहेत. सद्य:स्थितीत त्यातील ३९ हजार ४४७ जागा रिक्त आहेत. अद्याप विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुढील दोन दिवसांची मुदत आहे. त्यातून आणखी काही प्रवेश निश्चित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा यात तब्बल २२,४९२ एवढी भरघोस वाढ झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात १,१७,९३८ विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला होता. तर कोरोनापूर्वी २०१९-२०२० मध्ये ही संख्या ७१,३५०  एवढी होती. 

सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार यंदाही प्रवेशासाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यात तब्बल १,९७,३९८ विद्यार्थ्यांनी कॅप फेऱ्यांतून प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याने अडचणीत आलेल्या इंजिनीअरिंग महाविद्यालयांना यामुळे सुगीचे दिवस येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

यंदाही राज्यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि त्यासंबंधित शाखांना सर्वाधिक जागा असून, त्याच शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याचे चित्र आहे. कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या यंदा ४६,२९० जागा उपलब्ध असून तिसऱ्या फेरीअखेर त्यामध्ये ३३,३५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.