शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

इस्टेफॅनीयाची शाळा आणि... येस, वी कॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 9:17 AM

आज येस वी कॅन फाउंडेशनने व्यावसायिक शिक्षक घेऊन तीन बसमधल्या आणि चार निर्वासित छावण्यांमध्ये शाळा सुरू केल्या आहेत. २०१९ सालापासून या  १० देशांतील ३१०० मुलांना शिक्षण देण्यात आलं आहे.

इस्टेफॅनीया रेबेलॉन या ३२ वर्षीय महिलेचं बरंचसं आयुष्य तसं खडतर गेलं. तिच्या आयुष्याची सुरुवातीची अनेक वर्षे तिच्या कुटुंबाने कोलंबियातून पळून आलेले आश्रित म्हणून अमेरिकन नागरिकत्व घेण्यासाठी खर्च केली. खरं म्हणजे इस्टेफॅनीयाचे आईवडील दोघंही वकील होते. दोघंही कोलंबियामध्ये वकिली करत होते. पण काही कारणांनी तिच्या वडिलांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. जीव वाचवण्यासाठी त्यांना भूमिगत व्हावं लागलं आणि अखेरीस मुलाबाळांसह देश सोडून पळून जावं लागलं. १० वर्षांची इस्टेफॅनीया, तिची  दोन भावंडं आणि आईवडील असे पाच जण अमेरिकेच्या आश्रयाला आले. पण कुठल्याही देशात असा राजकीय आश्रय काही एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी खूप लांबलचक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते,  एवढं करून तुम्हाला राजकीय आश्रय मिळेल आणि त्या देशाचं नागरिकत्व मिळेल याची  शाश्वती नसते. त्यामुळे अमेरिकेत प्रत्यक्ष राजकीय आश्रय आणि नागरिकत्व मिळेपर्यंतचा काळ त्या कुटुंबासाठी अत्यंत तणावपूर्ण आणि अस्थिर होता.

मात्र इस्टेफॅनीयाच्या कुटुंबीयांचं नशीब चांगलं, की त्यांना अमेरिकेने नागरिकत्व दिलं आणि त्याहीपेक्षा इस्टेफॅनीयाचं नशीब चांगलं की तिला शाळेत फार चांगले शिक्षक भेटले. मायामीमधल्या तिच्या शाळेतील शिक्षकांनी तिच्या शिक्षणाकडे तर विशेष लक्ष दिलंच, पण त्याचबरोबर तिचा हा सगळा प्रवासही समजून घेतला, त्यात तिला जास्तीचे अडथळे आले ते समजून घेतले आणि तिला आवश्यक ती सगळी मदत केली. अमेरिकेत आल्यापासून आर्थिकदृष्ट्या स्थिरावण्यासाठी तिचे आईवडील सतत कामात असायचे. त्यांच्या वकिलीच्या डिग्रीचा अमेरिकेत काही उपयोग नव्हता. त्यामुळे आई मुलांची काळजी घेण्याबरोबरच दोन दोन नोकऱ्या करायची तर वडील अनेकदा रात्रपाळी करून जास्तीचे पैसे कमवायचे. त्यामुळे इस्टेफॅनीयाच्या शैक्षणिक आयुष्यावर तिच्या शिक्षकांचा खूप जास्त प्रभाव होता.

खरं म्हणजे तिला मोठं होऊन अभिनय करायचा होता. त्यासाठी ती घराबाहेर पडून एकविसाव्या वर्षी लॉस एंजेलिस इथे आलीही होती. मात्र ती एका मेक्सिकोच्या सीमारेषेजवळच्या तिजुआना या ठिकाणच्या निर्वासित छावणीमध्ये गेली आणि त्या क्षणापासून तिचं आयुष्य कायमसाठी बदलून गेलं. तिथल्या निर्वासित छावणीतल्या मुलांकडे बघून इस्टेफॅनीयाला स्वतःचं बालपण आठवलं. आणि तिच्या लक्षात आलं, की तिला निदान शाळेत गेल्यावर तरी चांगले शिक्षक लाभले होते, पण इथल्या मुलांना तर शाळाही नव्हती आणि शिक्षकही नव्हते. प्राथमिक शिक्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षांमध्ये ही मुलं शिक्षणापासून पूर्णतः वंचित राहिलेली होती. आणि त्यांच्या कुटुंबीयांचा त्या परिस्थितीला पूर्ण नाइलाज होता.त्या निर्वासित छावणीतून परत आल्यावर इस्टेफॅनीयाने पुन्हा तिच्या करिअरचा विचार करून पाहिला. ती म्हणते, “विस्थापितांचं आयुष्य काय असतं याची मला पूण कल्पना आहे. मी तिथे जे दृश्य पाहिलं ते मी विसरूच शकत नव्हते. मला परत जावंच लागलं.” 

इस्टेफॅनीया आणि  काईल श्मिट या दोघांनी त्यांच्या बचतीतील १००० डॉलर्स (सुमारे ८ लाख रुपये) खर्च केले आणि त्यातून तंबू आणि शाळा सुरू करण्यासाठी लागणारं इतर साहित्य विकत घेतलं. ते त्या निर्वासित छावणीत गेले आणि  शाळा सुरू होते आहे असं सांगितलं आणि थोड्याच वेळात त्यांच्याभोवती  ५० मुलं गोळा झाली. या ५० मुलांना घेऊन इस्टेफॅनीयाच्या ‘येस वी कॅन फाउंडेशन’ची पहिली शाळा सुरू झाली.काही दिवसांनी त्या निर्वासित छावणीतील लोकांना जरा पक्क्या निवाऱ्यात हलवलं गेलं, त्यावेळी या दोघांना त्या मुलांना पुढचं शिक्षण देण्याची इच्छा होती. पण आता ते शिक्षण सुरू कसं ठेवणार? इस्टेफॅनीया म्हणते, “आम्ही विचार केला, की आपण एखाद्या बसमध्ये शाळा सुरू केली तर? ती बसच घेऊन आपल्याला ठिकठिकाणी फिरता येईल.” त्यानंतर इस्टेफॅनीया आणि काईल या  शाळा चालवण्यासाठी पहिली बस विकत घेतली. ऑनलाइन शोधलं की बसमधली शाळा कशी चालवतात.

आज येस वी कॅन फाउंडेशनने व्यावसायिक शिक्षक घेऊन तीन बसमधल्या आणि चार निर्वासित छावण्यांमध्ये शाळा सुरू केल्या आहेत. २०१९ सालापासून या  १० देशांतील ३१०० मुलांना शिक्षण देण्यात आलं आहे.

येस, वी कॅन!इस्टेफॅनीया म्हणते, “आम्ही करतो ते काम कायमस्वरूपी सुरू रहावं असं मला वाटतं. भविष्यात मागे वळून पाहताना आपण केलेल्या कामाबद्दल समाधान वाटलं पाहिजे. लोकांनी असं म्हटलं पाहिजे, की ज्यावेळी आम्हाला खरंच गरज होती त्यावेळी हे लोक तिथे होते.” तसं काम आता तिने सहकाऱ्यांसह सुरु केलं आहे. आणि त्यात यशही मिळत आहे. 

टॅग्स :Schoolशाळा