पुणे : कोरोनामुळे दहावी व बारावी परीक्षेसाठी देण्यात आलेल्या शाळा तिथे परीक्षा केंद्र, वाढीव वेळ, अभ्यासक्रम कपात या सवलती यापुढे रद्द करण्यात येणार आहेत. आगामी वर्षात फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पूर्वीप्रमाणेच घेण्यात येणार आहेत.कोरोनाच्या परिणामांचा विचार करून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत राज्य २०२२ मध्ये घेण्यात अलेल्या परीक्षेमध्ये अनेक सवलती दिल्या होत्या. यामध्ये अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली होती. पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ दिला होता. यावर्षी ‘शाळा तिथे परीक्षा केंद्र’ न ठेवता जवळच्या शाळेतील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल तर २०२३ ची परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आहे तशाच राहतील.
यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्वीप्रमाणे होतील. कोरोनामुळे दिलेली अधिक वेळ व इतर सवलती असणार नाहीत. पूर्वीच्या परीक्षा केंद्र जोडणीनुसार मुख्य केंद्रावरच परीक्षेचे आयोजन होईल, असे बैठकीदरम्यान राज्य मंडळाने म्हटले आहे.- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ