लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी असणारी अंतिम मुदत वाढविण्यात आली असून आता २८ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, ही मुदत २७ जुलै सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष फेरी २४ जुलै रोजी जाहीर झाली या फेरीत ९३ हजार २०२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी, आतापर्यंत ५२ हजार ७७१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केले आहे. या फेरीत पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
अकरावी ऑनलाइन प्रवेश निश्चित करण्यास मुदतवाढ, २८ जुलैपर्यंत करता येणार नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 10:57 PM