नवी दिल्ली : एका शेतकऱ्याच्या मुलीने देशातच नव्हे तर जगभरात आपले आणि आपल्या गावाचे नाव रोशन केले आहे. तमिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील 17 वर्षांच्या मुलीला अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या शिकागो विद्यापीठातून जवळपास 3 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
तमिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील स्वेगा सामीनाथन या 17 वर्षांच्या मुलीला अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवण्यासाठी 3 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. स्वेगा सामीनाथन हिचे वडील शेतकरी आहेत. तिचे कुटुंब इरोड जिल्ह्यातील कासीपलायम नावाच्या छोट्या गावात राहते.
डेक्सटेरिटी ग्लोबल संस्थेने स्वेगाला हे यश मिळवण्यास मदत केली. डेक्सटेरिटी ग्लोबल संस्थेने सांगितले की, स्वेगा इरोडमधील कासिपलायम गावातील असून, ती संस्थेत सामील झाली आणि नेतृत्व विकास आणि करिअर विकास कार्यक्रमांतर्गत तिला प्रशिक्षण देण्यात आले होते.
संस्थाला यशाचे श्रेयदरम्यान, ही शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून, आपल्या यशाचे श्रेय डेक्सटेरिटी ग्लोबल संस्था आणि संस्थापक शरद सागर यांना दिले आहे. स्वेगा सामीनाथन म्हणाली की, जेव्हा 14 वर्षांची होती, तेव्हा डेक्सटेरिटी ग्लोबलने मला ओळखले आणि तयार केले.