शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

ऑनलाइनमुळे हरवली ऑफलाइन शिक्षण शिकण्यातील मजा; अनेक जण वंचित 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 5:44 AM

विद्यार्थ्यांची खंत; इंटरनेटअभावी गरीब, ग्रामीण मुले शिक्षणापासून वंचित

सीमा महांगडेमुंबई : शाळेची पहिली घंटा... ती ऐकताच आपापल्या वर्गात धाव घेणारे विद्यार्थी, राष्ट्रगीत, प्रार्थनेचे सूर... अशी शाळेची सुरुवात दरवर्षी ठरलेलीच असते. मात्र, काेराेनामुळे गेले वर्षभर मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षण ऑनलाईन झाले, पण ऑफलाईन शिकण्यातील मजा हरवली, अशी खंत विद्यार्थ्यांमध्ये आहे. शिवाय राज्यातील अनेक गरीब विद्यार्थी या इंटरनेटच्या जाळ्याबाहेर असल्याने शिक्षणापासून वंचित आहेत.

सुरुवातीला दोन-चार महिने ऑनलाईन अभ्यास जोमात होता, त्यानंतर याकडे बऱ्याच अंशी दुर्लक्ष झाले. ऑनलाईन पद्धतीत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संवादच होत नसल्यामुळे अध्ययन-अध्यापनात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. या व्यवस्थेत शिक्षकांनी केलेले अध्यापन विद्यार्थ्यांना समजते की नाही, याचा उलगडा होत नसून, अध्ययन आणि अध्यापन रटाळवाणे, कंटाळवाणे होत असल्याचे मत विद्यार्थी, पालकांनी मांडले. अल्पावधीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाईन शिक्षण परवडणारे आहे. मात्र, दीर्घकाळासाठी ते परवडणारे नाही, असे मत शिक्षक, पालकांनी व्यक्त केले.

 सकारात्मक बाजू 

  • काेराेनाचा धोका न पत्करता विद्यार्थी शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधू लागले.
  • मुलाच्या ऑनलाईन अभ्यासवर पालकांना लक्ष ठेवणे सोपे झाले.
  • मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहण्याऐवजी मुले ऑनलाईन अभ्यासात व्यस्त झाली.
  • पूर्वी सहा तास शाळा, त्याला जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन तास तयारी, घरी आल्यावर पुन्हा क्लासेस यासाठी जाणारा वेळ कमी झाला. अनेक मुले घरासमोरील मोकळ्या जागा, सोसायट्यांच्या रिकाम्या जागेत अधिक काळ खेळू लागली.
  • तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गाेडी वाटू लागली. यू ट्यूबसह इतर तंत्रांचा अचूक वापर करता येऊ लागला.

 

 नकारात्मक बाजू 

  • मोबाईल, टॅब किंवा संगणकासमोर अधिक काळ बसल्यामुळे डोळे, कानाचे आजार उद्भवू शकतात.
  • विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केल्यामुळे काही गैरप्रकारही घडू लागले. विद्यार्थ्यांची सायबर सिक्युरिटी धोक्यात आली.
  • विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संवाद नसल्यामुळे सर्वांगिण विकासात अडथळा निर्माण झाला. अभ्यासातील रटाळपणा वाढला.
  • ग्रामीण तसेच शहरातील अनेक भागांत इंटरनेटच्या समस्येमुळे व्हिडीओ डाऊनलोड, ऑनलाईन लिंक ओपन न हाेणे अशा समस्या आल्या. अनेक गरीब पालकांकडे अँड्रॉईड मोबाइल, टॅब,  संगणक यापैकी कोणतेही साधन नसल्यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंड तयार हाेऊ लागला.
टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन