कल्याण-सिंधूदुर्ग येथील वेंगूर्ला नगर परिषदेत कार्यरत असताना उपायुक्त रामदास कोकरे यांनी वेंगूर्ला नगरपरिषद डंपिंग मुक्त केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत वेंगूर्ला पॅटनचा धडा सीबीएससी बोर्डाने इयत्ता सहावीच्या विज्ञान पुस्तकात समाविष्ट केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून तो विद्याथ्र्याना अभ्यासासाठी असणार आहे. कचरा हा फेकण्याचा विषय नसून शिकण्याचा विषय आहे अशी प्रक्रिया उपायु्कत कोकरे यांनी यांनी व्यक्त केली आहे.
उपायुक्त कोकरे हे सध्या कल्याण डोंबिवली महापालिकच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्त पदी कार्यरत आहे. कल्याण डोंबिवलीत त्यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कल्पनेतून शून्य कचरा मोहिम मे २०२० सालापासून राबविणो सुरु केले आहे. कल्याण डोंबिवलीही कचरा मुक्त करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आह. यापूर्वी त्यानी वेंगूर्ला, कर्जत, माथेरान या ठिकाणी काम केले आहे. या तिन्ही नगरपरिषदा त्यांनी डंपिंग ग्राऊंड मुक्त करुन त्याठिकाणी कचरा प्रकल्प राबविले आहेत. तसेच दापोली नगरपरिषद ही प्लास्टीक मुक्त करण्यात कोकरे यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी राबविलेल्या वेंगूर्ला पॅटर्नची दखल घेऊन त्याचा धडाच सीबीएससी बोर्डाने इयत्ता सहावीच्या विद्याथ्र्याना शिकण्यासाठी लावला आहे. विज्ञानाच्या पुस्तका हा धडा असणार आहे. जून 2क्22 पासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षात हा धडा विद्याथ्र्याना शिकता येणार आहे.
या आधी उपायुक्त कोकरे यांच्या कामाचा दखल घेत माथेरान नगर परिषदेने एका रस्त्याला उपायुक्त कोकरे यांचे नाव दिले आहे. आत्ता त्यांचा धडा पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे कोकरे यांनी सांगितले की, कचरा हा फेकण्याचा विषय नसून शिकण्याचा विषय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत कल्याण डोंबिवली महापालिका डंपिंग मुक्त करीत शून्य कचरा मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.