शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आयटीआयमध्ये मुलींचे ‘पुढचे पाऊल’; प्रवेशांत वाढला ओघ, व्यावसायिक आघाडी गाजविण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 6:20 AM

ITI : २०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांना २१,२२२ मुलींनी प्रवेश घेतला होता. मात्र, २०१९मध्ये हीच संख्या १८,८९५ इतकी कमी झाली. २०२१मध्ये अवघ्या १६,९३४ विद्यार्थिनींनी आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला.

-  सीमा महांगडे 

मुंबई : परीक्षेत कमी गुण मिळालेले विद्यार्थी आणि विशेषतः मुलेच आयटीआयकडे वळत असल्याचे चित्र आणि समज गेल्या काही वर्षांपासून बदलत आहे. यंदा आयटीआयमधील सॉफ्ट ट्रेडसोबत हार्ड ट्रेड प्रवेशासाठीही आता मुली पसंती दर्शवत असल्याचे प्रवेशातील टक्केवारीवरून दिसत आहे. मुलींच्या टक्क्यात झालेली वाढ महिला सबलीकरणाच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याची प्रतिक्रिया आयटीआयचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिली. 

आजवर काही ठराविक ट्रेडलाच मुलींसाठी आयटीआयमध्ये प्रवेश दिला जात होता. परंतु गेल्या पाच-सात वर्षात मशिन ट्रेडलाही मुलींचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय वायरमन, इलेक्ट्रीशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर, स्टेनो मराठी, इंग्रजी, हिंदी या ट्रेडला प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढत आहे. हार्डकोअर ट्रेडला मुलींच्या प्रवेशाचे आणि त्यांना उद्योगांत मिळत असलेल्या संधीचे प्रमाण लक्षात घेता मुलींना अधिकाधिक चांगली संधी मिळावी, यासाठी त्यांची प्रवेशाची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना संस्थांना देऊन त्यांच्याकडून तसे प्रयत्न करून घेतल्याची माहिती दळवी यांनी दिली.

२०१८ मध्ये विविध अभ्यासक्रमांना २१,२२२ मुलींनी प्रवेश घेतला होता. मात्र, २०१९मध्ये हीच संख्या १८,८९५ इतकी कमी झाली. २०२१मध्ये अवघ्या १६,९३४ विद्यार्थिनींनी आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला.

मागील वर्षी आणि या वर्षीची  प्रवेशातील मुलींची आकडेवारी

विभाग           शासकीय आयटीआय    खासगी आयटीआय               २०२१-२२    २०२०-२१    २०२१-२२    २०२०-२१मुंबई      २१४७      २७४६    २१९०     ७१पुणे      १६७९       १९५८     ३३२    ३१९नाशिक      २३१९     २७०९     २३०     ३१०औरंगाबाद      २४५१     २८५८    २३४     २६२अमरावती      ३५१०    ४१७५    १११    ९९नागपूर      ३३२९    ३७५४     ५०८      ५०४एकूण      १५४३५    १८२००    १४९९     १५६५

राज्यातील मुलांसह मुलीही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी कौशल्यक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रयत्नशील आहे. आयटीआयमधील विद्यार्थिनींसाठी बदलते ट्रेंड आणि संधी, यूएन वुमनसोबतचा फ्लाईट प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. व्यावसायिक शिक्षणातील महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या दृष्टीने आयटीआय प्रवेशात वाढ ही उत्तम सुरुवात आहे.-मनीषा वर्मा, प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग  

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षण