Goa Board Class 12th result: गोव्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून (GBSHSE) इयत्ता १२ वीचा (HSSC) निकाल उद्या किंवा मंगळवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या शिक्षण विभागाच्या https://gbshse.gov.in/ या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
गोवा शिक्षण बोर्डाचा इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्याचं वृत्त सोशल मीडियात व्हायरल झालं होतं. पण अद्याप निकाल जाहीर झालेला नसून उद्या म्हणजेच १९ किंवा २० जुलै रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. (Goa Board Class 12th result to be released soon at gbshse.gov.in)
"गोवा शिक्षण विभागाचा इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्याच्या बातम्या काही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. पण त्या पूर्णपणे फेक असून अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. येत्या एक, दोन दिवसात निकालाबाबतची घोषणा शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाईल", अशी माहिती गोवा बोर्डाचे अध्यक्ष भागीरथ शेट्ये यांनी दिली आहे.
कुठे पाहता येणार निकाल?गोवा शिक्षण बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रत https://gbshse.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा सीट क्रमांक, जन्मतारीख, शाळेचा अनुक्रमांक आणि विद्यार्थ्याचं नाव अशी माहिती भरावी लागणार आहे.