शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
2
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!
3
"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान
4
परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प
5
धक्कादायक! २५ मुलींना जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये उकळले; बनावट IRS चा झाला पर्दाफाश
6
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
7
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
8
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले
9
पान मसालाच्या जाहिरातीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणची प्रतिक्रिया, म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!
11
ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
12
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
13
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
14
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
15
वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
16
'सिंघम अगेन'मधील सलमान खानच्या कॅमिओवर रोहित शेट्टी म्हणाला, "त्याच्या सुरक्षेमुळे..."
17
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
18
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
19
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
20
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान

आरोग्याचे धडे आता ब्रेल लिपीतही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2022 9:28 AM

कोरोनाच्या काळानंतर अनेक नागरिक आरोग्य साक्षर  झाले आहेत. आरोग्यविषयक उपलब्ध  साहित्य वाचनातही वाढ झाल्याची नोंद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आजारांची लक्षणे काय, त्यावर उपाय कोणते, मूलभूत आजारांची सद्य:स्थिती काय, या सगळ्या गोष्टींची माहिती दृष्टिहीन व्यक्तींना त्यांच्या भाषेत वाचता यावी, याकरिता सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या साहाय्याने नाशिकच्या ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेने आरोग्याचे ज्ञान असणारे ‘आरोग्य संजीवनी’ हे पुस्तक ब्रेल लिपीमध्ये काढले आहे. त्यामुळे राज्यातील दृष्टिहीन व्यक्तींना फायदा होणार आहे. 

कोरोनाच्या काळानंतर अनेक नागरिक आरोग्य साक्षर  झाले आहेत. आरोग्यविषयक उपलब्ध  साहित्य वाचनातही वाढ झाल्याची नोंद आहे. त्यासाठी काही जण वेबसाइट्सचा आधार घेत आहेत. मात्र, दृष्टिहीन व्यक्तींना आरोग्याबाबत जनजागृती करणारे साहित्य, माहिती ब्रेल लिपीत उपलब्ध नव्हते. त्याकरिता नाशिकच्या या संस्थेने पुढाकार घेतला आहे. राज्यात सुमारे ३० हजार दृष्टिहीन व्यक्ती ब्रेल लिपीचा वापर करून वाचन करत आहेत. 

पुस्तकात २५४ पाने असून, यामध्ये मूलभूत आरोग्याबाबत माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकाची किंमत ८०० रुपये असेल. सुरुवातीला ५०० पुस्तकांची पहिली आवृत्ती काढण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात त्याचे प्रकाशन मुंबईत करण्यात येणार आहे. या पुस्तकांचा दृष्टिहीन व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे. 

आरोग्य क्षेत्रातील माहिती दृष्टिहीन व्यक्तींना वाचता यावी, त्यांना त्याचे ज्ञान उपलब्ध व्हावे याकरिता सायन हॉस्पिटलच्या सहकार्याने हे पुस्तक लवकरच प्रकाशित केले जाणार आहे. ब्रेल लिपी वाचणाऱ्यांची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे. राज्यात ७५ दृष्टिहीन व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्था असून, त्यात शाळांचाही समावेश आहे. अशा संस्थांना हे पुस्तक मोफत देण्यात येईल. तसेच राज्यातील महापालिकांनीही ही पुस्तके विकत घेऊन दृष्टिहिनांसाठी उपलब्ध करून द्यायला हवी.      - अरुण भारस्कर, अध्यक्ष, ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन

आमच्याकडे आम्ही रुग्णांना आजाराची माहिती व्हावी, या हेतूने आरोग्य मार्गदर्शिका नावाचे एक पुस्तक तयार केले होते. त्यामध्ये सायन हॉस्पिटलमधील ३० डॉक्टरांचा सहभाग असून, त्यांनी आरोग्याच्या विविध विषयांवर त्यांचे लिखाण या पुस्तकांसाठी केले आहे. नाशिकच्या संस्थेने आम्हाला संपर्क करून त्यांना ही माहिती दृष्टिहीन व्यक्तींसाठी ब्रेलमध्ये उपलब्ध करून देण्याची इच्छा दर्शविली. त्याप्रमाणे ते पुस्तक तयार झाले असून, लवकरच त्याचे प्रकाशन केले जाईल. - मोहन जोशी, अधिष्ठाता, सायन हॉस्पिटल