HOAG Summer School: विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या अधिक मनोरंजक बनवण्यासाठी HOAG या भारतातील अग्रगण्य इमर्सिव्ह समर स्कूल प्रोग्रामने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. iHUB दिव्यसंपर्क आणि IIT रुरकी यांच्यासोबत भागीदारी करून HOAG ने देशातील पहिला आयव्ही-ग्रेड समर स्कूल प्रोग्राम सुरू केला आहे. हा उपक्रम भारतातील समर स्कूल्सना नवसंजीवनी देण्यासाठी सज्ज आहे. या उपक्रमा अंतर्गत ११ ते १७ या वयोगटातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टयांतील मनोरंजक कार्यक्रमांसह एक अनोखा शैक्षणिक अनुभवदेखील मिळणार आहे.
समर स्कूल ही संकल्पना भारतीयांच्या दृष्टीने काहीशी रोचक आणि मनोरंजक आहे. समर स्कूल्स म्हटले की भारतीय विद्यार्थ्यांच्या पालकांची नजर पाश्चिमात्त्य देशांकडे जाते. हे विद्यार्थी आयव्ही लीग विद्यापीठे आणि इतर प्रतिष्ठित जागतिक संस्थांतील उपक्रमांमध्ये प्रवेश घेतात. पण HOAG ने ही समस्या भारतातच सोडवली आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभवात्मक शिक्षण, नावीन्यपूर्ण प्रकल्पांची मांडणी आणि शैक्षणिक व उद्योगातील काही विचारांच्या मार्गदर्शनासह एकत्रित कल्पना डिझाइन करण्याची संधी देतो.
शिक्षणाची अनोखी संधी
"HOAG सोबतची आमची भागीदारी भारतात आयव्ही-ग्रेड उन्हाळी शाळेचा अनुभव घेऊन येते. HOAG च्या नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीसह उत्तम योजना आखून आम्ही विद्यार्थ्यांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांमधील अंतर भरून काढणारी शिक्षणाची अनोखी संधी देतो. यातूनच भविष्यातील 'लीडर्स' तयार होतात," असे IIT रुरकी येथील iHUB दिव्यसंपर्कचे बोर्ड सदस्य आणि सीईओ मनीष आनंद यांनी सांगितले.
जागतिक संस्थांमध्ये मिळणारी संधी प्राप्त होईल
"भारताला पारंपारिक वर्गातील शिक्षणाच्या पलीकडे जाणाऱ्या उच्च-गुणवत्तेच्या, नव्या शिक्षण अनुभवांची गरज आहे. HOAG सोबतच्या आमच्या एकत्रित उपक्रमातून आम्ही युवा भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या समर स्कूल्समध्ये सहभागी होण्याची संधी देत आहोत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कल्पक विचारसरणी, सर्जनशीलता आणि त्याचा वास्तविक जगातील समस्या सोडवण्याशी मेळ घालण्याला प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमामुळे भारतीय विद्यार्थ्यांनाही जागतिक संस्थांमध्ये मिळणारी संधी प्राप्त होईल," असा विश्वास EEE विभाग आणि प्रमुख अन्वेषक, ई अँड आयसीटी अकादमी आणि दक्ष गुरुकुल, IIT गुवाहाटीचे प्राध्यापक डॉ. गौरव त्रिवेदी यांनी व्यक्त केला.
जागतिक समर स्कूल्सला तुल्यबळ संधी देण्याचे उद्दिष्ट
"भारतातील तरुण विद्यार्थ्यांना खरोखरच वेगळ्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी iHUB दिव्यसंपर्क, IIT रुरकी सोबत भागीदारी केल्याने आम्ही खुश आहोत. भारतातील एका प्रमुख संस्थाचा वारसा आणि इमर्सिव्ह शिक्षण प्रवास तयार करण्यात आमचा हातभार लागल्याचा आम्हाला आनंद आहे. जागतिक स्तरावरील समर स्कूल्समध्ये विद्यार्थ्यांना ज्या संधी मिळतात, त्या तोलामोलाच्या संधी येथे आमच्या समर स्कूल्समध्ये देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे," असे HOAG चे संस्थापक अदेत्य व्हीएन चोप्रा म्हणाले.