पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालाप्रमाणे बारावीच्या निकालात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य मंडळाकडून निकाल पाहण्यासाठी पाच संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आली आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द केल्यामुळे दहावी, अकरावी आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा बारावी परीक्षेसाठी १३ लाख १७ हजार ७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही. या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी एक संधी असेल असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
निकाल पाहण्यासाठी... hscresult.11thadmission.org.in msbshse.co.in hscresult.mkcl.org mahresult.nic.in. lokmat.news18.com