मुंबई : उच्च शिक्षण सीईटी परीक्षा ११ ऑक्टोबरपासून राज्यभरात सुरू झाली. मागील वर्षापेक्षा यंदा या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ६४ हजार ४२४ एवढी वाढ झाली.
मागील वर्षी उच्च शिक्षणाच्या ८ अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ११ हजार २५ होती. यंदा ही संख्या १ लाख ७५ हजार ४४९ इतकी आहे. बीएड अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षार्थींमध्ये यंदा २६ हजार १७६ विद्यार्थ्यांची वाढ दिसून आली. बीएडप्रमाणेच एलएलबी (३ वर्षे), एलएलबी (५ वर्षे) अभ्यासक्रमाच्या सीईटी विद्यार्थ्यांमध्येही अनुक्रमे १८ हजार ९५४ आणि १० हजार ०७२ एवढी विद्यार्थी संख्या वाढली.कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम परीक्षा देणाºया विद्यार्थी संख्येत झालेल्या वाढीच्या स्वरूपात दिसून आल्याचे मत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मांडले.