शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भारत शिकवणार श्रीलंकेच्या ४० लाख मुलांना...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 8:37 AM

चीननं श्रीलंकेला लालूच दाखवताना त्यांना मोठं कर्ज तर दिलं, पण सावकारी दरानं ते वसूलही केलं.

आपल्याला स्वास्थ्य हवे असेल, शांतता हवी असेल आणि शिवाय गरजेच्या वेळी मदत हवी असेल, तर आपल्या शेजाऱ्यांशी आपलं नातं चांगलंच असायला हवं. काहीवेळा आपला शेजारी आखडू असतो, त्याला आपल्याविषयी आकस वाटत असू शकतो, क्वचित काहीवेळा तो आपल्याला पाण्यातही पाहात असतो, तरीही शेजाऱ्यांशी संबंध चांगले ठेवायचे असतील तर त्याची सुरुवात आपल्याला स्वत:पासूनच करावी लागते. शेजाऱ्यापेक्षा आपली स्थिती कितीही चांगली असली, तरीही एकमेकांशी असलेले सलोख्याचे संबंध शेवटी दोघांच्याही हिताचे असतात. भारतानंही याबाबत नेहेमीच शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याची काळजी घेतली आहे.‘थोरला भाऊ’ म्हणून त्यांच्या चुका पदरात घेऊन त्यांना वेळोवेळी मदतही केली आहे. अगदी पाकिस्तानपासून कोणताही देश याला अपवाद नाही.

ज्यांनी या मोठ्या भावाशी पंगा घेऊन इतरांशी संग करण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याचे दुष्परिणामही भोगावे लागले आहेत. त्याचेच ताजे उदाहरण आहे श्रीलंका. भारताशी जवळीक सोडून त्यांनी चीनशी दोस्ताना करण्याचा प्रयत्न केला. याच नव्या दोस्ताने त्यांना अक्षरश : तोंडावर आपटताना भीकेला लावलं आणि न घरका न घाटका अशा दरिद्री अवस्थेत आणून सोडलं. तरीही भारतानं आपल्या या शेजारी देशाला मदत करणं सोडलं नाही. श्रीलंकेचे डोळे आता उघडले असून भारतानं त्यांना वेळोवेळी जी मदत केली, करीत आहे, त्या आधारावरच हा देश संकटातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत आहे. 

कुठूनही फारशी मदत मिळत नसताना भारतानं श्रीलंकेला जी मदत केली, त्या मदतीच्या माध्यमातूनच आता श्रीलंकेतील तब्बल ४० लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होणार आहे. भिकेला लागलेल्या आणि दोन वेळच्या जेवणालाही महाग झालेल्या श्रीलंकेला भारतानं गेल्यावर्षी तब्बल एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत केली होती. याच पैशांतील सुमारे एक कोटी डॉलर्सचा उपयोग करून श्रीलंका आपल्या देशातील सुमारे निम्म्या म्हणजे ४० लाख विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांची छपाई करणार आहे.  

गाळात बुडालेल्या या शेजाऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी भारत यापुढील काळातही श्रीलंकेला मदत करणार आहे. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साब्रे आणि या मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी याबाबत भारताचं ऋण व्यक्त करताना म्हटलं आहे, भारत आमचा सच्चा मित्र आहे. आमच्या कठीण काळात भारत कायमच आमच्या पाठीशी उभा राहिला आहे. आताही आम्ही त्याचं प्रत्यंतर घेत आहोत. त्याचवेळी चीननं मात्र श्रीलंकेचं सारं लोणी ओरबाडून खाऊन झाल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. 

चीननं श्रीलंकेला लालूच दाखवताना त्यांना मोठं कर्ज तर दिलं, पण सावकारी दरानं ते वसूलही केलं. चीनकडून घेतलेल्या कर्जाचं साधं व्याजही आपण फेडू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर श्रीलंकेला आपलं हंबनटोटा हे बेट चीनला ९९ वर्षांच्या करारानं लीजवर देऊन टाकावं लागलं. श्रीलंकेच्या अध : पतनाची ही सुरुवात होती. त्यानंतर श्रीलंका अशा तऱ्हेनं गाळात रुतत गेला की, त्यातून बाहेर निघणं या देशाला अशक्य झालं. 

याच काळात ‘नेबरहूड फर्स्ट’ या धोरणांतर्गत भारतानं श्रीलंकेला वारेमाप मदत केली. भारतानं श्रीलंकेला आतापर्यंत ३२ हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. तीही अतिशय अल्प व्याजदरानं. याच मदतीच्या जोरावर श्रीलंका आता आपल्याला सावरू पाहतो आहे. आपल्या देशातील मुलांना, तरुणांना शिक्षण मिळालं नाही, तर भविष्यातही आपल्या देशाची काहीच पत उरणार नाही, हे लक्षात आल्यानंतर भारतानं केलेल्या मदतीचा उपयोग श्रीलंका प्राधान्यानं शिक्षणावर खर्च करतो आहे. याच माध्यमातून श्रीलंका आता भारतातून स्वस्त दरात प्रिंटिंग पेपर आणि त्याच्याशी निगडित साहित्य खरेदी करणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांची आणि इतर शैक्षणिक गरजांची पूर्तता होऊ शकेल. भारतानं केलेल्या मदतीतूनच श्रीलंका जीवनावश्यक वस्तू, अन्न, औषध, पेट्रोल, डिझेल, रेल्वे, ऊर्जा इत्यादींसाठी खर्च करीत आहे.

टॅग्स :Educationशिक्षण