International Literacy Day 2022: आज जागतिक साक्षरता दिवस; जाणून घ्या, कोणत्या राज्यात जास्त साक्षर लोक आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 03:08 PM2022-09-08T15:08:00+5:302022-09-08T15:08:35+5:30

International Literacy Day 2022: जगभरात आज साजरा केला जातोय जागतिक साक्षरता दिवस; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

International Literacy Day 2022 World Literacy Day Today Know Which State Of India Has More Educated People | International Literacy Day 2022: आज जागतिक साक्षरता दिवस; जाणून घ्या, कोणत्या राज्यात जास्त साक्षर लोक आहेत?

International Literacy Day 2022: आज जागतिक साक्षरता दिवस; जाणून घ्या, कोणत्या राज्यात जास्त साक्षर लोक आहेत?

googlenewsNext

नवी दिल्ली : आज जागतिक साक्षरता दिवस आहे. जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. शिक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी साक्षरता दिन साजरा केला जातो. प्रत्येक देश आणि राज्यासाठी साक्षरता खूप महत्त्वाची आहे, जी राष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) सर्वेक्षणानुसार, भारताचा एकूण साक्षरता दर 77.7 टक्के आहे. ग्रामीण भागात 73.5 टक्के आणि शहरी भागात 87.7 टक्के लोक साक्षर आहेत. देशात केरळमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. केरळमध्ये 96.2 टक्के लोक साक्षर आहेत.

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, जगभरातील 771 मिलियन निरक्षर लोकांसमोर साक्षरतेची आव्हाने कायम आहेत, त्यापैकी बहुतांश महिला आहेत, ज्यांच्याकडे अजूनही मूलभूत वाचन आणि लेखन कौशल्य नाही आहे. त्यांना अतिसंवेदनशीलतेचा सामना करावा लागतो.

दुसरीकडे, हितचिंतकांचे म्हणणे असे की, साक्षरतेच्या माध्यमातून केवळ गरिबी, बेरोजगारी आणि लैंगिक असमानता हळूहळू नष्ट केली जाऊ शकत नाही तर त्यांच्या क्षेत्रांमध्ये आणि समाजांमध्ये मानवी हक्कांना चालना देण्यासाठी देखील मदत करू शकतात. जे आपल्या अधिकाऱ्यांच्या ज्ञानाच्या कमतरतेमुळे पीडित आहेत.

दरम्यान, या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची थीम 'ट्रांसफॉर्मिंग लिटरेसी लर्निंग स्पेसेस' (Transforming Literacy Learning Spaces) आहे. याचा फोकस लोकांना साक्षरता शिकण्याच्या जागांच्या मूलभूत महत्त्वाचा पुनर्विचार करण्यासाठी आणि जगभरातील सर्व व्यक्तींसाठी दर्जेदार, न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी आग्रह करणे आहे.

कधीपासून साजरा होत आहे साक्षरता दिवस?
आंतरराष्ट्रीय पातळीवर 1966 पासून साक्षरता दिवस साजरा होत आहे. याआधी 1965 मध्ये 8 ते 19 सप्टेंबर दरम्यान इराणची राजधानी तेहरान येथे जगभरातील देशांच्या शिक्षणमंत्र्यांची एक बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यानंतर युनेस्कोने दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस (International Literacy Day) साजरा केला जाईल, असे जाहीर केले. या घोषणेनंतर दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिवस साजरा केला जात आहे. 

साक्षरता म्हणजे काय? 
साक्षरता हा शब्द साक्षर या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ वाचन आणि लिहिण्यास सक्षम असणे असा होतो. जगातील सर्व देश त्यांच्या प्रत्येक वर्गातील नागरिकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने साक्षरता दिवस साजरा करतात. भारतात सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती किमान एका भाषेत लिहू-वाचू-बोलू शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजतात. थोडक्यात साक्षरतेसाठी देशात अक्षर ओळख असण्याला महत्त्व आहे. पण साक्षरता म्हणजे एवढेच नाही तर साक्षरता म्हणजे आपल्या हक्कांविषयी आणि कर्तव्यांविषयी जाणीव असणे. 

Web Title: International Literacy Day 2022 World Literacy Day Today Know Which State Of India Has More Educated People

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.