- ‘नवीन शैक्षणिक धोरण’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या बेचक्यात अडकलेल्या शिक्षकांनी काय करायला हवे? तयार उत्तर यंदाच्या लोकमत ‘दीपोत्सव’मध्ये!
एकीकडे प्रत्यक्ष कृतीमध्ये येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण आणि निबंध लिहिण्यापासून गणिते सोडविण्यापर्यंत सगळीकडे मुलांच्या मदतीसाठी सज्ज होऊ घातलेली चॅट जीपीटीसारखी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची साधने, या दुहेरी पेचात अडकलेल्या शिक्षकांपुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न एकच आहे : या सगळ्या झपाट्यात आपले काय होणार? आपण कसे टिकणार? या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देणारा लेख यावर्षीच्या ‘लोकमत’ ‘दीपोत्सव’चे खास वैशिष्ट्य असणार आहे : नाशिकमधील ख्यातकीर्त इस्पॅलिअर स्कूलचे संचालक, शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी या लेखातून शिक्षकांना एकच सांगत आहेत : शिक्षकांनो, थोडे (बि)घडा आणि बदला!
यापुढे ‘पायथॅगोरसचा सिद्धांत’ शिकण्यासाठी पालक मुलांना शाळेत पाठविणार नाहीत. ऑनलाइन शिक्षणातून जगातले उत्तम शिक्षक त्यांना ‘पायथॅगोरस’ शिकवतील. विद्यार्थी शाळेत येतील ते नाचायला, गाणं म्हणायला, मैदानावर खेळायला; आणि सवंगड्यांसोबत एकत्र राहून शिकायला! या मुलांना ‘शिकवण्या’ची जबाबदारी पार पाडणं, हे शिक्षकांसाठी आव्हानात्मक ठरत जाणार आहे…त्यासाठी काय करावं लागेल?- या कळीच्या प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख शिक्षकांबरोबरच शाळा आणि संस्थाचालकांनाही निकट भविष्यातल्या वाटचालीची दिशा दाखविणारा आहे!
तीन लाख प्रतींचा खप ओलांडून ‘अंक नव्हे, उत्सव!’ हे घोषवाक्य सार्थ ठरवणारा ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ हा दिवाळी अंक लवकरच सर्वत्र उपलब्ध होईल!अधिक माहिती / ऑनलाइन खरेदी : deepotsav.lokmat.com संपर्कासाठी मोबाइल क्रमांक : मयूर कांबळे : 99300 66567