शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

एकाच वर्षात 400 हून अधिक पीएचडीधारक! आयआयटी बॉम्बे ठरली देशातील पहिली शैक्षणिक संस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 6:56 AM

एकाच वर्षी तब्बल ४०० हून अधिक पदवीधर संशोधक देणारी आयआयटी बॉम्बे ही देशातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे.

मुंबई :

एकाच वर्षी तब्बल ४०० हून अधिक पदवीधर संशोधक देणारी आयआयटी बॉम्बे ही देशातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे. यंदा आयआयटी बॉम्बेतून तब्बल ४४९ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. यामुळे स्टेम शिक्षणातील (सायन्स, टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी, गणित) हा एक मैलाचा दगड ठरला आहे. आयआयटी बॉम्बेचा ६० वा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. कोविड पूर्वकाळातील वातावरण, कोविडकाळातील अडचणी - समस्या आणि कोविडकाळानंतर येणाऱ्या संधी असे ३ विविध टप्पे पाहिलेली यंदाची पदवीची बॅच असल्याने आयआयटी बॉम्बेचे संचालक शुभाशीष चौधरी यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

आयआयटी बॉम्बेच्या ६० व्या दीक्षांत समारंभात २ हजार ३२४ विद्यार्थ्यांना एकूण २ हजार ५५१ पदव्या बहाल करण्यात आल्या. आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली. तुम्ही सगळे भारताचे भविष्य असून आज तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता पदवी प्राप्त करून सिद्ध केली आहे, आता या जगातील माणुसकीला बळकटी देणे आणि ती कायम राखण्याची जबाबदारी तुमची असल्याचे बिर्ला यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

दीक्षांत समारंभात ३५ संशोधक विद्यार्थ्यांची नाईक आणि रस्तोगी सर्वोत्कृष्ट  पीएचडी प्रबंध पुरस्कारासाठी ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी ४ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके बहाल करण्यात आली. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेच्या मोहम्मद अली रेहान याला प्रेसिडेंट ऑफ इंडिया मेडलने सन्मानित करण्यात आले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या कौस्तुव जाना याला २०२०-२१ साठी तर अर्यमान मिथानी याला २०२१-२२ साठी इन्स्टिट्यूट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले.  कॉम्प्युटर सायन्स आनंद इंजिनिअरिंग विभागाच्या श्रेया पथक हिला डॉ. शंकर दयाल शर्मा  गोल्ड मेडल बहाल करण्यात आले. आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी काळात संस्थेकडून देण्यात आलेले प्रशिक्षण नक्कीच सक्षम नेतृत्व घडविण्यात मदत करेल. देशाच्या गरजा ध्यानात घेऊन हे विद्यार्थी नक्कीच शैक्षणिक व कॉर्पोरेट क्षेत्रात आपले योगदान देतील. - प्रा. शुभाशीष चौधरी, संचालक, आयआयटी बॉम्बे 

 

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षण