पुणे : वैद्यकीय प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचे (नीट) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि. १२) उपलब्ध झाले आहेत. अर्ज क्रमांक व जन्मतारीख सबमिट करून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. ही परीक्षा देशातील ४९७ शहरांमध्ये रविवारी (दि. १७) दुपारी २ ते सायंकाळी ५.२० या वेळेत हाेईल. प्रवेशपत्र दाखवल्याशिवाय विद्यार्थ्याला केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
येथे मिळेल प्रवेशपत्र
हे प्रवेशपत्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ehttps://neet.nta.nic.in/ या वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळू शकणार आहेत.
येथे करा चाैकशी
- प्रवेशपत्रासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी ०११-४०७५९००० या क्रमांकावर किंवा neet@nta.ac.in. या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या दोन्ही माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडवण्यात येतील, अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.
ही आहे नियमावली
- पावसाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी वेळेआधीच केंद्रांवर उपस्थित राहणे आवश्यक.
- ‘नीट’ परीक्षा ज्या शहरांमध्ये होणार आहे, त्या शहरांमधील केंद्रांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- काही विद्यार्थ्यांनी एनटीएकडे परीक्षा केंद्र आणि शहर बदलण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनुसार त्यांचे केंद्र बदलण्यात आले आहे.
- आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र बदलले जाणार नाहीत.
पूरस्थिती ओढवली तर काय ?
देशाच्या अनेक भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पूरस्थिती ओढवली आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी जोरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या दिवशीच पूर परिस्थिती ओढवली, परीक्षा देता आली नाही तर काय करायचे, याबाबत एनटीएकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नाही.