शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

मुलीला प्रेरित करण्यासाठी वडिलांनी सुरू केला NEETचा अभ्यास; दोघेही चांगल्या गुणांनी पास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 3:05 PM

NEET Success Story: मुलीला अभ्यासात प्रेरणा मिळावी, यासाठी डॉक्टर पित्यानेही NEET ची परीक्षा दिली.

NEET Success Story: पालक आपल्या मुलांना यशस्वी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका वडिलांनी आपल्या मुलीला प्रेरित करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा, म्हणजेच NEET UG 2023 ची तयारी करणाऱ्या मुलीसाठी डॉक्टर बापानेही NEET चा अभ्यास केला आणि तिच्यासोबत परीक्षा दिली. 

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मिताली खेतान, हिने आपल्या वडिलांप्रमाणे डॉक्टर बनण्यासाठी NEET चा अभ्यास सुरू केला. मिताली रात्री अभ्यास करायची, त्यामुळे डॉ. प्रकाश खेतान यांनीही दिवसभर काम केल्यानंतर मुलीसोबत रात्री अभ्यास सुरू केला. विशेष म्हणजे, डॉ. खेतान यांनीही मुलीसोबत NEET ची परीक्षा दिली आणि त्यात पासही झाले.

कोटाच्या वातावरणाने घाबरवलेडॉ. प्रकाश खेतान सांगतात की, त्यांनी त्यांच्या मुलीला NEET ची तयारी करण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथे पाठवले होते. पण, मागील काही दिवसांपासून तिथली परिस्थिती बिघडली होती. अनेक विद्यार्थी कोटामध्ये नैराश्येत येऊन आत्महत्या करू लागले. यामुळे डॉ. खेतान घाबरले आणि त्यांनी मुलीला परत बोलावून घेतले. 

मितालीने वडिलांपेक्षा जास्त गुण घेतलेमुलीला प्रेरित करण्यासाठी वडिलांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी केली. दोघांना NEET UG 2023 साठी वेगवेगळी परीक्षा केंद्रे मिळाली. जून महिन्यात परीक्षेचा निकाल आला, यात मितालीला 90 टक्क्यांहून अधिक तर डॉ. खेतान यांना 89 टक्के गुण मिळाले आहेत. यानंतर मितालीने कर्नाटकातील प्रसिद्ध कॉलेज कस्तुरबा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला.

गिनीज बुकमध्ये नोंद डॉ. प्रकाश खेतान, हे प्रसिद्ध न्यूरो सर्जन आहेत. 1992 मध्ये सीपीएमटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि एमबीबीएस पूर्ण केले. त्यानंतर 1999 मध्ये लखनऊमधून एमएस सर्जरी आणि 2003 मध्ये एमसीएच न्यूरो सर्जरीचा अभ्यास पूर्ण केला. त्यांनी अनेक अवघड ऑपरेशन्स केली आहेत. 13 एप्रिल 2011 रोजी त्यांनी 8 तासांच्या शस्त्रक्रियेत 18 वर्षांच्या मुलीच्या मेंदूतील 296 सिस्ट काढले. यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. 

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालexamपरीक्षाStudentविद्यार्थीUttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टरInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षण