Odisha MLA 49th passed 10th Examination: ओडिशामध्ये सत्ताधारी बिजू जनता दलाचे आमदार पूर्णचंद्र स्वेन (Purna Chandra Swain) यांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी इयत्ता १० वीमध्ये यश मिळवले.ओडिशा माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑफलाइन घेतलेल्या १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५,२२३ विद्यार्थ्यांपैकी पूर्णचंद्र स्वेन हे एक आहेत.
किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? ओडिशा माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या ऑफलाइन परीक्षेत ५,२२३ विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. तर १४१ विद्यार्थी नापास झाले आहेत. जवळपास ८०.८३ टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये ३,१०० मुले आणि २,१३३ मुलींचा समावेश आहे.
ऑनलाइन परिक्षेत झाले होते नापासकोरोना संकट काळात ओडिशामध्ये इयत्ता १० वीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती, या परिक्षेसाठी गंजम जिल्ह्यातील सुराडा येथील बिजू जनता दलाचे आमदार पूर्णचंद्र स्वेन देखील उपस्थित होते. परंतु काही विद्यार्थ्यांनी परिक्षेत नापास झाल्यानंतर आक्षेप घेतला होता. त्यानंतर ऑफलाइन बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.
५०० पैकी ३४० गुण मिळवलेकोरोनामुळे ऑनलाइन जाहीर झालेले निकाल बोर्डाने रद्द केल्यानंतर पुन्हा ऑफलाइन बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. यावेळी बिजू जनता दलाचे आमदार पूर्णचंद्र स्वेन यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. या परिक्षेत त्यांनी ५०० पैकी ३४० गुण मिळवले. दरम्यान, आमदार पूर्णचंद्र स्वेन हे वयाच्या ४९ व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.