शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मुक्त विद्यापीठ पदवी प्रथम, द्वितीय वर्ष परीक्षा वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2021 6:22 PM

  लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या ऑनलाईन ...

ठळक मुद्देपहिल्या तुकडीतील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या विभागीय केंद्रात ३ सप्टेंबरपासून तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड या दुसऱ्या तुकडीतील विभागीय केंद्राच्या अंतर्गत ४ सप्टेंबरपासून सुरू होतील.विद्यार्थ्यांना वेळापत्रकात उल्लेखलेल्या तारखेनुसार व आपल्या तुकडीनुसारच परीक्षा देता येईल.

 लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून विद्यार्थी संख्या जास्त असल्याने तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी विभागीय केंद्रांच्या दोन तुकड्या (बॅचेस) तयार करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व परीक्षा नियंत्रक भटुप्रसाद पाटील यांनी दिली.बी.ए. आणि बी.कॉम अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या ज्या विषयांच्या परीक्षा ११ ऑगस्टपासून सुरू होणार होत्या, त्या नव्या बदलाप्रमाणे पहिल्या तुकडीतील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या विभागीय केंद्रात ३ सप्टेंबरपासून तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड या दुसऱ्या तुकडीतील विभागीय केंद्राच्या अंतर्गत ४ सप्टेंबरपासून सुरू होतील. बी.ए. आणि बी.कॉम शिक्षणक्रमाच्या द्वितिय वर्षाच्या परीक्षाच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले असून सर्व बदल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परीक्षेसाठी वेळापत्रक विद्यापीठ विभागकेंद्रानिहाय दोन तुकड्यांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून त्या विभागातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्या त्या बॅचनुसारच त्या विद्यार्थ्यांना परीक्षा उपलब्ध असेल. तुकडी क्रमांक १ अंतर्गत अमरावती विभागीय केंद्रातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद विभागीय केंद्र अंतर्गत औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, मुंबई विभागीय केंद्र अंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर विभागीय केंद्रअंतर्गत नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. तर तुकडी क्रमांक २ अंतर्गत : नाशिक विभागीय केंद्राच्या कक्षेत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे विभागीय केंद्राच्या कक्षेत पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर विभागीय केंद्राच्या कक्षेत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, तर नांदेड विभागीय केंद्राच्या कक्षेत नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्र व परीक्षा केंद्र यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांना वेळापत्रकात उल्लेखलेल्या तारखेनुसार व आपल्या तुकडीनुसारच परीक्षा देता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांची तुकडी किती तारखेला आहे ते काळजीपूर्वक तपासून त्याच दिवशी त्या त्या विषयाची परीक्षा वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या वेळेमध्ये द्यावी. द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉमच्या काही पेपरला विद्यार्थी संख्या अधिक असल्याने त्यांना सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान पेपर देता येऊ शकेल. काही पेपर्सना संख्या कमी असल्याने सकाळी ८ ते दुपारी १ किंवा दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत पेपर देता येणार आहे. तुकडीनिहाय द्वितीय वर्ष बी.ए. साठी पर्यावरणशास्त्र विषयाची परीक्षा पहिली व दुसरी तुकडी अनुक्रमे १२ आणि १३ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यानंतर द्वितीय वर्षासाठी तुकडीनिहाय परीक्षा नसेल.