शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

एटीकेटी विद्यार्थ्यांसह फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेशाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 6:45 AM

अकरावी प्रवेश प्रक्रिया; एफसीएफएस टप्पा २ चे वेळापत्रक जाहीर, विद्यार्थ्यांसाठी ९७ हजार जागा उपलब्ध

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीच्या (एफसीएफएस) पहिल्या टप्प्यातील तिन्ही प्रकारांची प्रवेश प्रक्रिया बुधवारी संपली. यानंतर आता दहावी फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या, एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांसाठी अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या एफसीएफएस टप्पा २ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही फेरी ३१ आॅगस्टपासून सुरू होऊन १७ सप्टेंबरपर्यंत चालेल.

प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरच दुसºया टप्प्यातील प्रवेश दिले जातील. शुक्रवारी दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर होणार असून यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी या फेरीत सहभागी होऊ शकतील.गुरुवारी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या. त्याचप्रमाणे अकरावी एफसीएफएस टप्पा २ साठी अकरावी आॅनलाइनच्या ९७,१५० जागा तर कोट्याच्या २५,७७१ जागा उपलब्ध आहेत. यात कला शाखेच्या १४,०४६, वाणिज्यच्या ४०,८८१, विज्ञान शाखेच्या ३९,८५८, एचएसव्हीसीच्या २,३६८ रिक्त जागांचा समावेश आहे. कोट्याच्या २५,७७१ जागांमध्ये अल्पसंख्याकांच्या १३,४६३, इनहाउसच्या ४,८३८ तर व्यवस्थापन कोट्याच्या ७,४७० जागा आहेत.हे विद्यार्थी होऊ शकतील सहभागीएफसीएफएस टप्पा २ मध्ये आतापर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, या फेरीपूर्वी प्रवेश रद्द केलेले, या फेरीपूर्वी प्रवेश नाकारलेले, एटीकेटी सवलतधारक, राज्य मंडळाच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेले तसेच राज्य मंडळाच्या फेरपरीक्षेतील एटीकेटी सवलतधारक विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. एफसीएफएस टप्पा २ फेरीमधील प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे खालील प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे.प्रथम आॅनलाइन क्लिक करणाºयास प्रथम प्रवेशच्रिक्त जागा, गुणवत्तेचा प्रकार व विद्यार्थ्याने आॅनलाइन पद्धतीने नोंदविलेली वेळ यानुसार प्रथम आॅनलाइन क्लिक करणाºयास प्रथम प्रवेश यानुसार प्रवेश होणार आहेत. ३१ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन लिंक उपलब्ध करून दिली जाईल.च्यामध्ये पूर्वी घेतलेला प्रवेश रद्द करता येतील. त्यासह नवीन अर्ज करणे, अर्ज निश्चिती करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येतील. फेरपरीक्षा, एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांना जवळच्या मार्गदर्शन केंद्रावरून नवीन माहिती पुस्तिका घेऊन लॉगइन आयडी व पासवर्डच्या साहाय्याने आॅनलाइन अर्ज भाग-१ पूर्ण करता येईल.च्आधीचे प्रवेश रद्द करणे - ३१ आॅगस्ट.च्३ ते ७ सप्टेंबर - नवीन अर्ज करणे, त्यांची निश्चिती करणे आणि अपूर्ण अर्ज पूर्ण करणे.च्७ सप्टेंबर - पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांची यादी.च्९ सप्टेंबर - पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडणे.च्९ ते ११ सप्टेंबर - प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात निश्चिती करणे.च्११ सप्टेंबर - दुसºया प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांची यादी.च्१३ सप्टेंबर - दुसºया प्रकारातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडणे.च्१३ ते १४ सप्टेंबर - दुसºया प्रकारात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात निश्चिती करणे.च्१४ सप्टेंबर - पहिल्या प्रकारातील विद्यार्थ्यांर्साठी रिक्त जागांची यादी.च्१६ सप्टेंबर - तिसºया प्रकारातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडणे.च्१६ ते १७ सप्टेंबर - तिसºया प्रकारात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश निश्चिती करणे.च्१७ सप्टेंबर - रिक्त जागांचा तपशील आॅनलाइन जाहीरहोणार.पहिला प्रकार - (६० टक्क्यांहून अधिक गुण असलेले विद्यार्थी) - दहावीच्या परीक्षेमध्ये ६० टक्के आणि त्याहून अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थी या प्रकारामध्ये अर्ज करू शकतील.दुसरा प्रकार - (दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी) - दहावी उत्तीर्ण विद्यार्थी शिवाय पहिल्या प्रकारात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत असे विद्यार्थीही यात सहभागी होऊ शकतील.तिसरा प्रकार - (राज्य मंडळाचे एटीकेटी विद्यार्थी) - राज्य मंडळाच्या फेरपरीक्षेतील एटीकेटी सवलतधारक विद्यार्थी आणि पहिल्या व दुसºया प्रकारात सहभागी न झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील.