शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

११वीसाठी ऐच्छिक सीईटी, मूल्यमापनाचा घोळ नको; विद्यार्थ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 6:14 AM

सीईटीत चांगले गुण मिळवणारे आणि ती प्रवेश परीक्षा न देणारे यांचा सारखाच विचार होणार असल्याने या ऐच्छिक परीक्षेला काय अर्थ उरला, असा मुद्दा मांडत शिक्षण विभागाने निर्णय घेताना घोळाची परंपरा कायम ठेवल्याची टीकाही त्यांनी केली आहे.  

मुंबई : दहावीच्या निकालासाठी मूल्यांकनाचे धोरण ठरवताना अंतर्गत मूल्यमापनाचा आधार, त्याला नववीच्या निकालाची दिलेली जोड यामुळे सं‌भ्रम कायम असतानाच अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी ऐच्छिक ठेवल्याच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीईटीत चांगले गुण मिळवणारे आणि ती प्रवेश परीक्षा न देणारे यांचा सारखाच विचार होणार असल्याने या ऐच्छिक परीक्षेला काय अर्थ उरला, असा मुद्दा मांडत शिक्षण विभागाने निर्णय घेताना घोळाची परंपरा कायम ठेवल्याची टीकाही त्यांनी केली आहे.  दहावीचा निकाल जून अखेरपर्यंत लावायचा आहे. शिवाय ज्यांचे अंतर्गत मूल्यमापनाने समाधान होणार नाही, त्यांच्यासाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेचाही पर्याय आहे. मात्र, कोरोनाची स्थिती निवळल्यानंतर ही परीक्षा होणार असल्याने तोवर अकरावीचे प्रवेश पूर्ण झालेले असतील. मग सुधारित गुणांच्या आधारे शाखा बदलता येईल का, तो पर्याय ठेवला तर अकरावीचं वर्ष वेळेत सुरू होईल का, असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळालेल्यांच्या गुणांचा अकरावीसाठी उपयोग होणार नाही का? सीईटी महत्त्वाची असेल तर ती ऐच्छिक का ठेवली, ती सक्तीची का नाही किंवा रद्दच का केली नाही, यातून फक्त संभ्रम वाढला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिक्षण विभागाने जो निर्णय दहावी मूल्यांकनाबाबत घेतला आहे, तो नक्कीच चांगला आहे. मात्र, अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी संदर्भातील निर्णय बंधनकारक ठेवावा, असे वाटते. समान गुणवत्तेवरील प्रवेशासाठी ते आवश्यक आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनात ९० टक्क्यांहून अधिक गुण असतील मात्र काही कारणास्तव ते सीईटी देऊ शकले नाहीत तर ते त्यांचे नुकसान असेल, असे मत नवी मुंबईतील नूतन मराठी विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी विवेक खुळे याने व्यक्त केले.आमचा नववीचा निकाल चांगला लागला. त्यावरून आमचे मूल्यमापन होणे योग्यच आहे, मात्र अचानक एमसीक्यू म्हणजे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने होणाऱ्या सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्यास त्याला जबाबदार कोण? अद्याप सीईटीचे प्रारूप, आराखडा, अभ्यासक्रम काहीच उपलब्ध नसताना ती कशी देणार? असा प्रश्न नेरूळमधील दहावीची विद्यार्थिनी सिद्धी चौधरी हिने उपस्थित केला. दहावीसाठी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली होती, तो अभ्यासक्रम सीईटीसाठी असणार का? शिवाय सीबीएसई, आयसीएसईच्या मुलांसोबत सीईटी देताना, त्यांचा अभ्यासक्रम, आमचा अभ्यासक्रम वेगळा असताना समानता कशी आणणार, असा प्रश्नही तिने उपस्थित केला. सीईटी परीक्षेची आमची अद्याप तयारी नाही, शिवाय ताेपर्यंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात येणार की नाही, त्याबद्दलही सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया पांचोलिया हायस्कूलमधील दहावीची विद्यार्थीनी प्रियांका कळंबे हिने दिली आहे.स्वरूप लवकर समजणे गरजेचेशाळेतील शिक्षकांनी दिलेल्या गुणांवर माझा विश्वास आहे. मात्र, अकरावीत लवकर प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार असेल तर किमान तिचे वेळापत्रक आणि कोणत्या विषयाला किती गुणांचे किती प्रश्न असतील, याचे स्वरूप लवकर समजायला हवे. ही प्रवेश परीक्षा सुरक्षित व्हावी.- धनश्री कुलकर्णी, दहावी, नूतन मराठी हायस्कूल