बिहारच्या दरभंगा येथे राहणारा संतोष कुमार यादव परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचल्याने त्याला नीट(NEET)च्या परीक्षेला बसू दिलं नाही. संतोष कुमार राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश चाचणीसाठी (NEET) साठी २४ तासांपेक्षा अधिक प्रवास करुन ७०० किमी अंतर पार करत कोलकातामध्ये पोहचला. परंतु परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी त्याला १० मिनिटे उशीर झाला आणि दुर्दैवाने त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही.
संतोष कुमार यादवला नीट परीक्षेसाठी कोलकाता पूर्वेकडील सॉल्ट लेक येथील एका शाळेत १.३० वाजता पोहचायचं होतं. परंतु परीक्षा केंद्रावर तो १ वाजून ४० मिनिटांनी पोहचला, त्यामुळे त्याला परीक्षेला बसू दिले नाही. निराश झालेला संतोषकुमार यादव म्हणाला की, त्यांनी अधिकाऱ्यांकडे बरीच विनवणी केली पण त्याचे ऐकले नाही, उशीर झाल्यामुळे त्याला परीक्षेला बसू दिले नाही, यामुळे संतोष कुमारला एक वर्ष गमावावं लागणार आहे.
कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणीसाठी घेतलेला वेळ लक्षात घेता उमेदवारांना किमान तीन तास अगोदर परीक्षा केंद्राकडे अहवाल देण्यास सांगण्यात आले. संतोष यादव म्हणाला की, शालेय अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही, परंतु NEETच्या उमेदवारांची होणारी गैरसोय ही राजकीय चर्चेचा विषय बनली आहे कारण अनेकांना परीक्षेसाठी भाड्याने घेतलेल्या गाड्यांमध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करावा लागला. त्याची मोठी रक्कम मोजावी लागली असं तो म्हणाला.
पश्चिम बंगाल सरकार विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवत नाही - भाजपा
पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले की, राज्य सरकार विद्यार्थ्यांची बाजू घेत नाही, पश्चिम बंगालमधील जेईई परीक्षेच्या वेळीही विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. एनईईटीवर दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने सांगितले होते विद्यार्थ्यांनी प्रवास आणि मुक्काम करण्यासाठी सरकारकडून मदत करावी.
तथापि, एनईईटी परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी राज्य सरकारने फेटाळल्या नाहीत. राज्याचे शिक्षणमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस पार्थ चटर्जी म्हणाले की, विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी देशव्यापी बंद रद्द केला असं सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मुंबईतून जाता जाता कंगना राणौतची शेरोशायरी; PoKवरून हटेना, टार्गेट शिवसेना!
सायन रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; मुंबई महापालिकेकडून चूक कबूल, २ जण निलंबित
...तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही; आमदार रोहित पवारांनी चिराग पासवानला झापलं
बिहार निवडणुकीत कंगना राणौत भाजपाची स्टार प्रचारक होणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
“मुख्यमंत्र्यांची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे”; भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका