मुंबई : देशातील गाव-खेड्यांमधील मुलांना उत्तम शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या माध्यमातून पोदार लर्न स्कूल हा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामार्फत देशातील जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये चांगले शिक्षण व सोयीसुविधा पुरविण्याचे काम करण्यात येत आहे. या संकल्पनेतून देशभरात ३६ शाळा सुरू झाल्या आहेत.भारतातील ग्रामीण शैक्षणिक उद्योजकांच्या दृष्टिकोनाला साहाय्य करण्यासाठी पोदार लर्न स्कूल ही शैक्षणिक फ्रँचायजी नेहमी अग्रेसर असते. सध्या या उपक्रमात पाच नव्या फ्रँचायजींचा समावेश झाला आहे. या शैक्षणिक प्रकल्पांमध्ये देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत ३६ निमशहरी आणि ग्रामीण उद्योजकांनी या संधीचा लाभ घेतला आहे. पोदार लर्न स्कूल मॉडेलमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी व नवीन पोदार लर्न स्कूल, पोस्टे पोदार लर्न स्कूल आणि बोर्डीकर पोदार लोन स्कूल या शाळादेखील सुरू केल्या आहेत.देशभरात सीबीएसई, आयसीएसई शाळा सुरू करण्यासाठी पोदार लर्न स्कूल साहाय्य करते. महाराष्ट्रातदेखील पीएसएलने शाळांसाठी सहकार्य केले आहे. यामध्ये यवतमाळ येथील विद्यालंकार्स पीएसएल, लातूर येथील पोस्टे पीएसएल, बीडमधील राजस्थानीज पीएसएल या फ्रँचायजी याची यशस्वी उदाहरणे आहेत.कोरोनाकाळातदेखील पीएसएलने तळागळातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे काम केले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होत आहेत.याविषयी पोदार एज्युकेशन नेटवर्कचे संचालक हर्ष पोदार म्हणाले की फ्रँचायजी देण्याचा उद्देश केवळ व्यवसाय वाढविण्यासाठी नसून, दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागात पोहोचविणे हा आहे. या संकल्पनेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रबळ आर्थिक समीकरण हा कोणत्याही यशस्वी व्यवसायाचा गाभा असतो. फ्रँचायजीचा फायदा फ्रँचायजर व फ्रँचायजी या दोघांना मिळायला हवा. हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असून, देशभरात उद्योजकांची बीजे पेरली जातील. यामुळे देशभरात शिक्षण, रोजगार, उत्पन्न व आर्थिक वाढ होईल. (वा.प्र.)
पोदार लर्न स्कूलमुळे देशातील ३६ ग्रामीण शैक्षणिक संस्थांना नवी उमेद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 5:51 AM