शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

गरीब विद्यार्थ्यांनाही हाेता येणार ‘सीए’, स्टायपेंडची रक्कम दुप्पट करण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 9:10 AM

या बदलाचा मसुदा गुरुवारी रात्री प्रकाशित झाला असून, त्यावर ३० दिवसांत सूचना करण्याचे आवाहन इंडियन चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) सांगण्यात आले आहे.

मुंबई : सीए होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तसेच आर्थिकदृष्ट्याही हे शिक्षण परवडणारे नाही. परंतु, आता नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सीए (सनदी लेखापाल) अभ्यासक्रमात बदल करण्याची कार्यवाही सुरू असून, त्यामध्ये काही बदल प्रस्तावित आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमादरम्यान दिल्या जाणाऱ्या स्टायपेंडची रक्कम दुप्पट करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नसलेले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या बदलाचा मसुदा गुरुवारी रात्री प्रकाशित झाला असून, त्यावर ३० दिवसांत सूचना करण्याचे आवाहन इंडियन चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) सांगण्यात आले आहे.आयपीसीसी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना आर्टिकलशीप करावी लागते. यादरम्यान एखाद्या प्रमाणित सीएच्या कार्यालयात काम करून अनुभव घ्यावा लागतो आणि यादरम्यान त्या विद्यार्थ्याला स्टायपेंड मिळतो. प्रस्तावित बदलानुसार सीएची परीक्षा विद्यार्थ्यांना आर्टिकलशीप झाल्यानंतर सहा महिन्यांनी देता येणार आहे. या सहा महिन्यांत विद्यार्थ्याला तयारी करावी लागणार आहे. स्वतःची प्रॅक्टिस करायची झाल्यास, त्याला तीन वर्षे आर्टिकलशीप करावी लागणार आहे. त्यानंतर एका वर्षाने परीक्षा देता येणार आहे. मात्र, कंपनीत सीए म्हणून नोकरी करायची झाल्यास, दोन वर्षे ‘आर्टिकलशीप’ ग्राह्य धरली जाणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थीही वळतीलविद्यार्थ्यांना आर्टिकलशीपदरम्यान मिळणारा स्टायपेंड कमी असल्याने उदरनिर्वाह आणि आर्थिक अडचणींचा प्रश्न उभा राहतो त्यामुळे स्टायपेंड वाढविण्याचा बदल या मसुद्यात प्रस्तावित आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सीए अभ्यासक्रमाकडे वळता येईल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण