शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; 9144 पदांवर बंपर भरती, 8 एप्रिल शेवटची तारीख...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 8:16 PM

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे.

Indian Railway Recruitment 2024 : तुम्ही सरकारीनोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या रेल्वे विभागात बंपर भरती निघाली आहे. यासाठी दहावी पास असणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. आता फॉर्म भरण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने भारतीय रेल्वेमध्ये तंत्रज्ञ पदांसाठी 9,144 पदांची भरती काढली आहे. 9 मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम तारीख 8 एप्रिल 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट https://indianrailways.gov.in/ वर अर्ज करू शकतात.

जाणून घ्या पदांची माहिती...तंत्रज्ञ श्रेणी-1 एकूण 1,092 पदेतंत्रज्ञ श्रेणी-3 एकूण 8,052 पदे

या भरतीमध्ये अहमदाबाद, अजमेर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू आणि श्रीनगर, कोलकाता, मुंबई, मुझफ्फरपूर, पटना, प्रयागराज, रांची, सिकंदराबाद, सिलीगुडी आणि तिरुवनंतपुरम या शहरांमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. 18 ते 36 वर्षे वयोगटातील उमेदवार टेक्निशियन ग्रेड-1 पदासाठी अर्ज करू शकतात, तर 18 ते 33 वर्षे वयोगटातील उमेदवार टेक्निशियन ग्रेड-III पदांसाठी अर्ज करू शकतात. एससी आणि एसटीला पाच वर्षांची तर ओबीसींना तीन वर्षांची सूट मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता-टेक्नीशियन ग्रेड-I सिग्नल -बीएससी (फिझिक्स, इलेक्ट्रॉनिक्सष कॉप्यूटर सायन्स, आयटी किंवा इंस्ट्रियूमेंटेशन/ बीई-बीटेक / तीन वर्षीय इंजीनिअरिंग डिप्लोमा).टेक्नीशियन ग्रेड-III -10वी पास आणिसंबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट. टेक्नीशियन ग्रेड-III (एस अँड टी) पदांसाठी 10वी , आयटीआय किंवा फिझिक्स, मॅथ्ससोबत 12वी पास.

फी किती-अनारक्षित, मागास आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PH आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी 250 रुपये फी निश्चित करण्यात आली आहे. फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे भरली जाऊ शकते.

वेतनश्रेणी-तंत्रज्ञ ग्रेड 1 उमेदवारांना दरमहा 29,200 पगार रुपये मिळेल तर, तंत्रज्ञ श्रेणी 3 उमेदवारांना दरमहा 19900 रुपये पगार मिळेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेGovernmentसरकारjobनोकरी