लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पदवी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाच्या कट ऑफमध्ये सरासरी २ ते ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे साहजिकच ८० टक्क्यांहून कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तिसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे.
बुधवारी पदवी प्रवेशाच्या जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत काही महाविद्यालयांत वाणिज्य आणि कला शाखांत २ ते ५ टक्क्यांनी कट ऑफ खाली आला आहे, तर काही महाविद्यालयांत विज्ञान शाखेचा कट ऑफ थेट २० टक्क्यांहून अधिक गुणांनी घसरल्याचे पाहायला मिळाले.
सेल्फ फायनान्स नव्वदीपारकला, विज्ञान, वाणिज्य या पारंपरिक शाखांबरोबरच यंदा सेल्फ फायनान्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याचे दिसून आले आहे. एफवाय प्रवेशाच्या मेरिट लिस्टवर हे दिसले. दुसऱ्या यादीनंतरही अनेक अभ्यासक्रमांसाठी कट ऑफ ९० टक्क्यांवर पोहोचली होती. नामांकित महाविद्यालयांत हा आकडा ९२ ते ९३ च्या घरात असल्याचे दिसले. झेविअर्स महाविद्यालयातील बीएमएस अभ्यासक्रमाचा कट ऑफ ०.२० टक्क्यांनी वाढला आहे. इतर ठिकाणी त्यात १ ते २ टक्क्यांची घसरण झाली आहे.