शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

...तर नववीऐवजी आठवीलाच नापास; नियमात स्पष्टता आणण्याची शिक्षण क्षेत्रातून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 6:33 AM

यंदापासून पाचवी-आठवीला तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाची वार्षिक परीक्षा घेऊन अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या अटीवर पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागावी आणि पुढील आव्हाने-स्पर्धांसाठी तयार होता यावे, यासाठी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. मात्र, त्यामुळे दहावीचा निकाल वाढविण्यासाठी नववीऐवजी आठवीलाच नापास करण्याचा प्रकार वाढू शकतो, याकडे काही शिक्षकांनी लक्ष वेधले, तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करण्यासाठी मिळालेला वेळही पुरेसा नसून त्याबाबत पुरेशी स्पष्टता यावी, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.

यंदापासून पाचवी-आठवीला तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाची वार्षिक परीक्षा घेऊन अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या अटीवर पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे. एप्रिलमध्ये निकाल लागल्यानंतर पुनर्परीक्षा जून-जुलैमध्ये घेतली जाईल, परंतु ‘३० एप्रिलनंतर शाळेला सुट्टी लागते. संपूर्ण मे महिना सुट्टीत जातो. शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. त्यानंतर, लगेचच पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. एप्रिलमध्ये मिळणारे अवघे १० ते १२ आणि जूनमध्ये मिळणारे १० ते १२ दिवस या साधारण २० ते २५ दिवसांत विद्यार्थ्यांना वर्षभरात शिकविलेल्या विषयाची तयारी कशी करून घ्यायची, असा प्रश्न आहे. त्यामुळे पूरक मार्गदर्शनाबाबत पुरेशी स्पष्टता यायला हवी,’ अशी अपेक्षा ‘लायन एम.पी. भुता सायन सार्वजनिक स्कूल’चे मुख्याध्यापक जगदीश इंदलकर यांनी व्यक्त केली.

भीती अनाठायीकाही शिक्षकांनी ही भीती अनाठायी असल्याचे म्हटले आहे. ‘परीक्षा व्यवस्थेचे सनियंत्रण करण्यासाठी ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे’च्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. याशिवाय तालुका, जिल्हा स्तरावर समित्या कार्यरत असतील. ज्या शिक्षकांना आपल्या मुलांच्या निकालाविषयी शंका असतील, त्यांना या समितीकडे दाद मागता येईल,’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केली.

बाह्य पर्यवेक्षण आवश्यक  दुसरे म्हणजे ‘अनेकदा दहावीचा निकाल चांगला लागावा, म्हणून कच्च्या विद्यार्थ्यांना नववीत अनुत्तीर्ण करण्याकडे काही खासगी शाळांचा कल असतो. हा प्रकार आता आठवीतच होऊ लागेल,’ अशी भीती एका शिक्षकाने व्यक्त केली.  त्यामुळे शाळांच्या परीक्षा-निकाल पद्धतीत पारदर्शकता यायला हवी आणि या सगळ्याचे बाह्य पर्यवेक्षण होणे आवश्यक आहे, अशी गरज व्यक्त होत आहे.

परीक्षा कशी होणार?  शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू आहे. त्यानुसार, एकच एक वार्षिक परीक्षेनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नव्हते.  परीक्षेचे दडपण न राहिल्याने मुले अभ्यास करत नाहीत, अशी सार्वत्रिक ओरड होत हाेती. त्यामुळे पाचवी आणि आठवीकरिता पुन्हा एकदा वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यानुसार, दोन्ही इयत्तांकरिता प्रत्येक विषयासाठी ५० ते ६० गुणांसाठी ही परीक्षा होईल. भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांकरिता ही परीक्षा घेतली जाणार आहे.  अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे का, हे तपासले जाईल. ही वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाईल. किमान ३५ टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतील. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेतली जाईल. मात्र, याही परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाईल. 

टॅग्स :Schoolशाळा