- प्रगती जाधव-पाटीलसातारा - ऑनलाइन अभ्यासक्रमाला ऑनलाईन परीक्षेनेचं तारले होते. ऑनलाइन पेपर सोडवताना स्प्लिट स्क्रीनवर एकीकडे पेपर तर दुसरीकडे गुगल कॉपी करुन उत्तीर्ण होणाऱ्या डिप्लोमावीरांनी ऑनलाईन परीक्षेत उत्तम गुण मिळवले. मात्र, ऑफलाइन परीक्षा घेतल्यानंतर फक्त २२ टक्के विद्यार्थीच ॲाल क्लिअर झाले आहेत. संज्ञा आणि संकल्पना स्पष्ट न झाल्याने हा धक्कादायक निकाल लागल्याचे तज्ञ सांगतात.
कोरोना दाखल झाल्यानंतर सर्वच महाविद्यालयांनी ऑफलाइन शिक्षणाला सुरुवात केली. महाविद्यालयांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या उद्देशाने वर्ग भरवले पण ऑनलाइन दिसणारी मुले प्रत्यक्ष वर्गात बसलीच नसल्याचे उघड झाले. पहिल्या सत्रात ऑनलाइन परीक्षा दिल्यामुळे विद्यार्थ्यांना स्प्लिट स्क्रीन करून कॉपी करण्याची संधी मिळाली. या संधीने त्यांना अगदी ९० टक्के पर्यंत ही पोहोचवले. द्वितीय सत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने ऑफलाइन परीक्षांचा पर्याय निवडला. पहिल्या सत्रात नव्वदी गाठलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा ही सहज सोपी होईल असे वाटले. मात्र, कोरोनाच्या दोन वर्षात लिखाणाचा तुटलेला सराव यासह संकल्पना स्पष्ट न झाल्याने उत्तर लिहिण्यात येणाऱ्या मर्यादा याची जाणीवच झाली नाही. परीक्षांचा निकाल आल्यानंतर या विद्यार्थ्यांसह पालकांचीही भंबेरी उडाली आहे. मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने पालकांनी आता शिकवणीचे अन्य मार्ग अवलंबण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर येत आहे.
ऑनलाईन शिक्षणात मुलांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या नाहीत.
अभियांत्रिकी संकल्पना स्वतःच्या भाषेत विद्यार्थ्यांना मांडता आल्या नाहीत.
ऑनलाइन मुळे प्रश्नांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थी सक्रिय नव्हते.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी पाठांतरावर भरवसा ठेवला.
ऑनलाईन परिक्षेमुळे पहिल्या सत्रात बहुपर्यायी प्रश्नांनी तारले .
ऑफलाइन परीक्षेने मात्र विद्यार्थ्यांना नापास करून अक्षरशः मारले.अभियांत्रिकीचा असा करावा अभ्यासअभियांत्रिकी अभ्यास पाठांतर केल्याने कधीच होत नाही. ‘आर. यू ए.’ या खास पध्दतीनेच हा अभ्यास करावा लागतो. यातील ‘आर’ म्हणजे रिमेंम्बर (लक्षात ठेवा), ‘यु’ म्हणजे अंडरस्टॅण्ड (समजनू घ्या) आणि ‘ए’ म्हणजे अॅप्लाय अर्थात (प्रत्यक्ष वापर).
पहिली सेमिस्टर अव्वल... नंतर कोलांट्या उड्याडिप्लोमा च्या द्वितीय सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या आणि एटी-केटी लागलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रात ८०-९० टक्क्यांपर्यंत गुण संपादन केले होते. या गुणांच्या खात्रीने डिप्लोमाचा अभ्यास सोपा असून अभ्यास न करताही उत्तम गुण मिळू शकतात असा भ्रम विद्यार्थ्यांना झाला. याच भ्रमाचा भोपळा फुटला आणि सुमारे ५२ टक्के विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले.
इयर डाऊन होऊन ही पुढच्या वर्गात शिकवणजिल्ह्यातील सर्वच डिप्लोमा शाखांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात सुमारे ५२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना आहे त्याच वर्गात बसण्याची वेळ येणार आहे. महाविद्यालयांमध्ये एकीकडे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची लगबग असतानाच दुसरीकडे मात्र पुढील वर्गांची ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे इयर डाऊन होऊन पण पुढच्या वर्गात शिकवणी घेऊन विद्यार्थी पालकांचे समाधान करत आहेत. प्रत्यक्षात ही मुलं पुढील वर्गात कसे जाणार त्यांचा अनुत्तीर्णचा शिक्का कसा पुसला जाणार याबाबत मात्र कोडेच आहे.
उत्तीर्ण : २२ टक्केवायडी : ५२ टक्केएटीकेटी : २६ टक्केअभियांत्रिकीचा अभ्यास हा पाठांतर करून होत नाही. यासाठी संकल्पना आणि सज्ञा यांचे स्पष्टीकरण असणे महत्वाचे असते. त्या स्पष्ट न झाल्याने यंदाचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. माहिती आणि ज्ञान यातील फरक ओळखून त्यानुसार तयारीला लागणे आवश्यक आहे. वाय. ढी. झालेले आणि एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता उत्तम ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.- विशाल ढाणे, खाजगी क्लासचालक