शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, आठवडाभरात दुसऱ्यांदा झाले दाखल
2
"आदिवासी नेत्याला CM पदावरून हटवणे अत्यंत दु:खद", हिमंता बिस्वा सरमा यांचा जेएमएम-काँग्रेसवर निशाणा
3
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
4
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
5
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
6
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
7
जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
8
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
9
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
10
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
11
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
12
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
13
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
14
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
15
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
16
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
17
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
18
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
19
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
20
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

केंद्र सरकारच्या विविध विभागात 17 हजार पदांवर बंपर भरती; वाचा संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 4:27 PM

24 जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ती 24 जुलैपर्यंत चालणार आहे.

SSC CGL Recruitment 2024 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) संयुक्त पदवी स्तर (CGL) 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. SSC CGL भरती अंतर्गत विविध विभागांमध्ये 17 हजारांहून अधिक रिक्त पदे भरली जातील. 24 जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ती 24 जुलैपर्यंत चालणार आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ssc.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकता. जाणून घ्या भरतीची संपूर्ण प्रक्रिया...

SSC CGL परीक्षा दोन स्तरांवर घेण्यात येते. टियर 1 सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये घेण्यात येईल, तर टियर 2 परीक्षा 2 डिसेंबर रोजी होईल. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना भारत सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग, संस्था आणि न्यायाधिकरणांमध्ये गट 'ब' आणि गट 'क' पदांवर नियुक्त केले जाईल.

या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा

  • अर्ज भरण्याची तारीख- 24 जून ते 24 जुलै 2024
  • परीक्षा फी भरण्याची अंतिम तारीख- 25 जुलै 2024
  • अर्जात बदल करण्याची शेवटची तारीख- 10 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 
  • टियर 1 परीक्षा तारीख- सप्टेंबर-ऑक्टोबर 2024
  • टियर 2 परीक्षा तारीख- डिसेंबर 2024

वयोमर्यादाउमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर पदे दिली जातील. जे उमेदवार त्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षात आहेत, ते देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 32 वर्षे आणि किमान वय 18 वर्षे असावे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सर्व प्रथम SSC च्या अधिकृत वेबसाइट https://ssc.gov.in/ वर जा.
  • यानंतर “ऑनलाइन अर्ज” लिंकवर क्लिक करा.
  • आता "नवीन नोंदणी" बटणावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरा आणि नोंदणी करा.
  • तुमचा नोंदणी आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करा आणि अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज फी भरा.

शैक्षणिक पात्रताउमेदवार कोणत्याही विषयात पदवीधर असावा. जे उमेदवार सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी पदासाठी अर्ज करत आहेत, त्यांच्याकडे पदवी आणि CA/CS/MBA/Cost & Management Accountant/Commerce Masters/Business Studies मध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (JSO) या पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर पदवी (12 वी मध्ये किमान 60% गणित) आवश्यक आहे.

अर्ज फीअर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये जमा करावे लागतील. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PWBD) आणि माजी सैनिकांना कुठलीही फी लागणार नाही. तुम्ही ऑनलाईन BHIM UPI, Net Banking, Visa, MasterCard, Maestro किंवा RuPay डेबिट कार्ड वापरुन फी भरू शकता. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकारexamपरीक्षाEmployeeकर्मचारी