लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिक्षण मंडळाच्या दहावीची परीक्षा गुरुवारपासून सुरु हाेत आहे. यंदा नऊ विभागीय मंडळातील ५ हजार ३३ केंद्रांवर १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी परीक्षा देतील. २ ते २५ मार्च या कालावधीत परीक्षा पार पडतील. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे जास्त दिली जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि काेकण या नऊ विभागीय मंडळातील २० हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली. निर्धारित वेळेपूर्वी सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता किमान अर्धा तास अगाेदर पाेहाेचावे. विद्यार्थ्यांना सकाळी ११ आणि दुपारी तीन वाजता प्रश्नपत्रिकेचे वितरण केले जाईल.
विद्यार्थ्यांची एकूण संख्या मुले ८,४४,११६ मुली ७,३३,०६७
परीक्षेच्या कालावधीत काॅपीला आळा घालण्यासाठी मंडळामार्फत राज्यरात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.