मुंबई - दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. ( Education Minister Varsha Gaikwad Says, The website for the SSC results will be unveiled soon )माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही प्रा. गायकवाड यांनी निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याचे घोषित केले होते. परंतु,दुपारीचे २ वाजले तरी अनेक विद्यार्थ्यांना निकालच पाहता आला नाही. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली.परिणामी साईट क्रॅश झाली होती. दरम्या्न, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही साईट पूर्ववत झाली नव्हती.
त्यामुळे निकाल पाहता येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून केल्या जात आहेत. याबाबत राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता; येत्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये साइट पूर्ववत सुरू होईल.त्यांनतर सर्व विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल, असे त्यांनी सांगितले.
दरवर्षी एमकेसीएल सह इतर संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाणे मोबाइलवर एसएमच्या माध्यमातून निकाल पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. परंतु यंदा केवळ एकच संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी दिले होते. राज्यतील १६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या संकेतस्थलळा भेट दिल्याने त्यावर ताण आला.
राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९९ .९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.