शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती कळणार एका क्लिकवर; महास्टुडण्ट ॲप विकसित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 9:29 AM

राज्यात प्रगत शैक्षणिक कार्यक्रमात तंत्रस्नेही शिक्षक व शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीनेच राज्यात सरल प्रणालीवर सर्व शिक्षक, शाळा व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात येते. त्यानंतर ही माहिती अद्ययावत करण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती आता डिजिटल पद्धतीने लागणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून महास्टुडण्ट नावाचे ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप गुगल स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपद्वारे उपस्थिती भरण्यास मान्यता दिल्याचे शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी सांगितले. 

राज्यात प्रगत शैक्षणिक कार्यक्रमात तंत्रस्नेही शिक्षक व शाळांची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीनेच राज्यात सरल प्रणालीवर सर्व शिक्षक, शाळा व विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात येते. त्यानंतर ही माहिती अद्ययावत करण्यात येते. भारत सरकारने परफॉर्मन्स ग्रेडिंग सिस्टम ही राज्यांचा शैक्षणिक निर्देशांक दर्शविणारी प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये डिजिटल पद्धतीने शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती दर्शविण्यासाठी गुण आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात राज्याने आणखी सुधारणा करावी, या उद्देशाने उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यासाठी शिक्षण विभागाकडून महास्टुडण्ट ॲप विकसित करण्यात आले आहे. 

या ॲपच्या मदतीने शिक्षकांना अनुपस्थित विद्यार्थ्यांची गैरहजेरी तत्काळ नोंदविता येणार आहे. तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक सांभाळून ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. याचसोबत मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकताही राहणार नाही. त्यामुळे राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावरील शिक्षक, विद्यार्थ्यांची माहिती कुठेही आणि केव्हाही एका क्लिकवर मिळू शकणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

शाळांमधील सुविधा गृहीत धरल्या का?nराज्यातील सर्वच जिल्हा आणि तालुका स्तरावरील शाळांमध्ये संगणक आणि मोबाईलची सुविधा असल्याचे शिक्षण विभागाने गृहीत धरल्याचे संतप्त प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी दिल्या आहेत. nया निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्याआधी सुविधांची माहिती घेणे, शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे ही कामे शिक्षण विभागाने करावीत आणि मग निर्देश द्यावेत अशी मते शिक्षक, मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहेत.

टॅग्स :Schoolशाळा