संघ लोक सेवा आयोगाच्या वतीने दर वर्षी नागरि सेवा परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी अर्ज करत असतात. मात्र फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळते. या परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची आयएएस, आयपीएस अथवा आयआरएस अधिकारी आदी पदांवर नियुक्ती केली जाते. आज आम्ही आपल्याला एका अशा विद्यार्थ्याची कहाणी सांगणार आहोत, ज्याने केवळ 17 दिवसांच्या तयारीतच यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले.
या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे अक्षत कौशल. अक्षत 2017 मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत 55वी रँक मिळवत IPS अधिकारी झाले. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हे यश 5व्या प्रयत्नात मिळविले. खरे तर यापूर्वी, 4 वेळा अपयश आल्याने त्यांनी यूपीएससीचा मार्ग सोडला होता. मात्र, परीक्षेला केवळ 17 दिवस शिल्लक असतानाच ते आपल्या काही मित्रांना भेटले. यावेळी झालेल्या गप्पांमुळे ते एवढे मोटीवेट झाले, की त्यांनी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि परीक्षा पासही झाले. त्यांनी केवळ 17 दिवस तयारी करूनच ही परीक्षी दिली होती.
यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अक्षत कौशल यांचा महत्वाचा सल्ला - 1. परीक्षा देण्यापूर्वी परीक्षेचा पॅटर्न आणि विषय व्यवस्थित समजून घ्या2. ही परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयासंदर्भात ओव्हर कॉन्फिडन्ट राहू नये3. परीक्षेच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांनी आपले सिनिअर्स आणि यूपीएससीची तयारी करणाऱ्या मित्रांशी चर्चा करावा. 4. अनेक विद्यार्थ्यांना वाटते की, 100% देऊनही यश मिळत नाही. अशा वेळी काही वेळासाठी थोडा ब्रेक घ्या आणि पुन्हा एव्या स्ट्रॅटजीने पुन्हा तयारीला लागा.