शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
4
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
6
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
7
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
8
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
9
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
10
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
11
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
12
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
13
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
14
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
15
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
16
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
17
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
18
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
19
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
20
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC ने काढली मेगा भरती; कोणाला अर्ज करता येणार? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 5:53 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे 827 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

UPSC CMS 2024 Exam: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे(UPSC) दरवर्षी विविध विभागातील पदे भरली जातात. या वर्षीदेखील युपीएससीने भरतीचा ओघ सुरुच ठेवला आहे. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले असेल आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फतसरकारीनोकरी मिळवण्याचे स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. UPSC ने जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर, असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यात 827 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. Combined Medical Services (CMS) ने या भरतीबाबत अधिसूचना जारी केली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीखUPSC द्वारे वैद्यकीय क्षेत्रात सरकारीनोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना Combined Medical Services परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे, तर 14 जुलै 2024 रोजी परीक्षा होणार आहे.

असा करा अर्ज-स्टेप 1: UPSC च्या अधिकृत वेबसाईट वर जा. upsconline.nic.in

स्टेप 2: OTR (वन टाइम रजिस्ट्रेशन) वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी  "New Registration" वर क्लिक करा.

स्टेप 3: तुम्हाला स्क्रीनवर नोंदणी फॉर्म दिसेल. यानंतर, ओटीआर फॉर्ममध्ये नाव, पालकांचे नाव, बोर्ड परीक्षेचा रोल नंबर, जन्मतारीख इत्यादी भरा.

स्टेप 4: UPSC CMS नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी "सबमिट" बटणावर क्लिक करा.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्ज भरा-

स्टेप 1: तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी, मोबाइल नंबर किंवा ओटीआर आयडीसह पोर्टलवर लॉग इन करा.

स्टेप 2: सर्व आवश्यक तपशीलांसह UPSC CMS ऑनलाइन फॉर्म भरा.

स्टेप 3: फोटो आणि स्वाक्षरीच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

स्टेप 4: ऑनलाइन फॉर्ममध्ये भरलेले तपशील पुन्हा तपासा आणि नंतर फी जमा करा.

स्टेप 5: भविष्यातील संदर्भासाठी UPSC CMS ऑनलाइन अर्ज 2024 ची प्रिंटआउट घ्या.

परीक्षा फीउमेदवार कोणत्याही SBI शाखेत रोख जमा करून किंवा नेट बँकिंग सुविधा/व्हिसा/मास्टर/रुपे क्रेडिट/डेबिट कार्ड/UPI द्वारे UPSC CMS अर्ज फी भरू शकतो. SC/ST/महिला/PWBD उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही. तर, इतर प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये भरावे लागतील. परीक्षेत बसण्यासाठी उमेदवारांनी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, 32 वर्षांपेक्षा जास्त वयाचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणGovernmentसरकारjobनोकरीMedicalवैद्यकीयdocterडॉक्टर