UPSC Civil Service Final Result 2021 : केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कारण पहिल्या तीन क्रमांकावर मुलीच आल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्माने (Shruti Sharma) देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. श्रुती शर्मा ही जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आरसीएची विद्यार्थिनी आहे. यंदा जामियाच्या आरसीएमधून एकूण २३ उमेदवारांनी यश मिळवलं आहे.
'यूपीएससी'चा निकाल जाहीर, श्रुती शर्मा देशात पहिली, महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकरची बाजी!
श्रुती शर्माने केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 परीक्षेत ऑल इंडिया रँक 1 (AIR 1) मिळवला आहे. श्रुती शर्मा ही उत्तर प्रदेशच्या बिजनोरची रहिवासी आहे. तिने दिल्लीमधील सेंट स्टिफन्स कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. तिनं इतिहास विषयातून बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर दिल्लीच्याच जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून (JNU) आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
गेल्या दोन वर्षांपासून श्रुती शर्मा जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादामधून केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करत होती.निकाल आल्यानंतर श्रुतीच्या घरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे.
श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे AIR रँक 2 आणि 3 पटकावला आहे. या वर्षीच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनीच बाजी मारली आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा युपीएससी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी नाव कोरलं आहे. इतर टॉपर्समध्ये ऐश्वर्या वर्मा (AIR 4), उत्कर्ष द्विवेदी (AIR 5), यक्ष चौधरी (AIR 6), सम्यक एस जैन (AIR 7), इशिता राठी (AIR 8), प्रीतम कुमार (AIR 9), हरकीरत सिंग रंधवा यांचा समावेश आहे. (AIR 10).