ॲनिमेटर म्हणजे काय? : चित्रपट, कमर्शियल्स, टीव्ही शो, व्हिडीओ गेम, कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि मोबाइल ॲपसाठीसुद्धा २डी, ३डी किंवा स्टॉप-मोशन ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करण्याचे मुख्य काम. हाताने किंवा कॉम्प्युटर सॉफ्टवेअरच्या साह्याने ॲनिमेशन सिक्वेन्सेस तयार करण्याचे कसब ॲनिमेटर्स वापरतात.
असे व्हा ॲनिमेटर : ॲनिमेटर्स मोशन पिक्चर स्टुडिओ, व्हिडीओ गेम, कार्टून नेटवर्क्स, जाहिरात एजन्सीज, वेब डिझाइन्स फर्म्स आणि मोबाइल टेक्नॉलॉजी कंपन्यांसाठी प्रोजेक्टच्या आधारावर काम करतात. वरिष्ठ पातळीवर आर्ट डायरेक्टर, हेड ऑफ स्टोरी, ॲनिमेशन टेक्निकल डायरेक्टर किंवा स्पेशल इफेक्ट्स डायरेक्टर होता येते. ॲनिमेटर्स प्रोड्यूसर किंवा डायरेक्टरही होऊ शकतात.
शिक्षण? : ॲनिमेटर्स हे आर्टिस्टिक ट्रेनिंग प्रोग्राम पूर्ण करतात व इंटर्नशिपमध्ये अनुभव मिळवतात. त्यासाठी ॲनिमेशनमध्ये बॅचलर डिग्री मिळवतात. काहीजण विविध क्षेत्रांचे स्पेशन ट्रेनिंग घेतात. यात स्पेशल इफेक्ट्स किंवा २डी ॲनिमेशनचा समावेश आहे.
सॉफ्ट स्किल्स विकसित करा : दहा सेकंदांच्या ॲनिमेटेड सिक्वेन्स परफेक्ट होण्यासाठी आठवडाही लागू शकतो. मानवी वर्तवणूक, चेहऱ्यावरील हावभाव व भावभावना ॲनिमेशनमध्ये कशा उतरवायच्या, याचे कौशल्य महत्त्वाचे ठरते.
प्रॉडक्शन प्रोसेस समजून घ्या : गेमिंग, फिल्म किंवा टेलिव्हिजन यापैकी कोणत्या उद्योग क्षेत्रासाठी आपण काम करीत आहोत, हे समजून घेणे आवश्यक ठरते. संबंधित उद्योगातील प्री-प्रॉडक्शन, प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शन हे टप्पे व त्यातील आपली भूमिका समजून घ्यावी. व्हिडीओ एडिटिंगची कला जाणून घ्यावी.
कौशल्यात सतत नावीन्य : नवी कौशल्ये, नवीन ॲनिमेशन सॉफ्टवेअर शिकण्यासाठी ऑनलाइन कोर्सेसची मदत घ्यावी. मास्टर ऑफ फाइन आर्ट्स इन ॲनिमेशन ॲण्ड व्हिज्युअल इफेक्ट्स ही पदव्युत्तर पदवी घेऊन वरिष्ठ पदावर दावा सांगू शकता.
डेमो रील तयार करा : तुम्ही तयार केलेल्या बेस्ट ॲनिमेटेड सिक्वेन्सेसचा दोन-तीन मिनिटांचा व्हिडीओ म्हणजेच एक डेमो रील तयार करा. तुमच्या वेबसाइटवर त्याची लिंक जोडा.
पोर्टफोलिओ : तुम्ही इंटर्नशिपमध्ये केलेले सर्वोत्तम काम आणि आजवरच्या संधी, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये याव्यात. अनेक ॲनिमेटर्सचे ऑनलाइन पोर्टफोलिओ आहेत. त्यामुळे ते सहजपणे त्यांचे काम शेअर करू शकतात.