कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले. त्याचाच आधार घेत आता देशात डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याविषयीची घोषणा करण्यात आली.
डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय?- विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम आणि पदवीचे शिक्षण पूर्णत: ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देणारे व्यासपीठ म्हणजे डिजिटल विद्यापीठ होय.- शिक्षणासाठी आवश्यक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल विद्यापीठ देशातील अन्य केंद्रीय विद्यापीठांशी समन्वय साधून काम करेल.- या विद्यापीठात कोणकोणते अभ्यासक्रम शिकवले जातील, हे अद्याप स्पष्ट नाही.- डिजिटल विद्यापीठात तंत्रशिक्षणाला अधिक प्राधान्य दिले जाईल, अशी अटकळ आहे.- शहरी तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही या विद्यापीठामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण प्राप्त होऊ शकेल.
असे असेल विद्यापीठ- इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात हे विद्यापीठ स्थापन होईल.- विविध भारतीय भाषांमध्ये ऑनलाइन शिक्षण घेता येऊ शकेल.- हब-स्पोक नेटवर्क प्रारूपावर हे विद्यापीठ कार्यरत असेल.
हब-स्पोक नेटवर्क प्रारूप म्हणजे?-हे एक असे प्रारूप आहे की ज्यात सर्व प्रक्रिया एका केंद्रीभूत हबवरून पार पडते व त्याचा लाभ अखेरच्या टप्प्यातील ग्राहकाला, म्हणजे स्पोक, होतो.- थोडक्यात डिजिटल विद्यापीठ या एका कॅम्पसमधून शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात असतील.- देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचा मान केरळकडे आहे. दुसरे राजस्थानात सुरू झाले.
जगातील टॉप १० डिजिटल विद्यापीठे-जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, अमेरिका- एडिनबरो विद्यापीठ, स्कॉटलंड- मँचेस्टर विद्यापीठ, ब्रिटन- सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया- किंग्ज कॉलेज लंडन, ब्रिटन.- ग्लास्गो विद्यापीठ, स्कॉटलंड- युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन, ब्रिटन- नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ, अमेरिका- कोलम्बिया विद्यापीठ, अमेरिका- कॅलिफोर्निया विद्यापीठ, अमेरिका