सध्याच्या स्पर्धात्मक युगात कुठलीही परीक्षा पास करण्यासाठी जनरल नॉलेज आणि करेंट अफेयर्सची माहिती असणं अत्यंत गरजेचे असते. याच्याशी निगडीत अनेक प्रश्न एमपीएससी, बँकिंग, रेल्वे आणि अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, असे काही प्रश्न जे कदाचित तुम्ही ऐकले नसतील. त्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे विचार करून द्या.
प्रश्न १ – कोणत्या फळाला पिकण्यासाठी जवळपास २ वर्षाचा कालावधी लागतो?
उत्तर – अननस हे ते फळ असून ज्याला पिकण्यासाठी २ वर्षाचा अवधी लागतो.
प्रश्न २ - भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे?
उत्तर - गंगा नदीतील ‘डॉल्फिन’ हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे आणि तो 'सुसू' या नावाने प्रसिद्ध आहे.
प्रश्न ३ - ताजमहाल कोणत्या मुघल शासकाने बांधला?
उत्तर - ताजमहाल मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधला होता.
प्रश्न ४ - दुर्बिणीचा शोध कोणी लावला हे तुम्हाला माहीत आहे का?
उत्तर - दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने लावला होता.
प्रश्न ५ - मोराचे आयुष्य किती वर्षे असते?
उत्तर - मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे, ज्याचे आयुष्य सुमारे १५ वर्षे आहे.
प्रश्न ६ - असं कोणतं फळ आहे, जे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचं विष बनतं?
उत्तर - टरबूज हे एकमेव फळ आहे जे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचे विष बनते.