"लघुपटामुळे मिळाली नवी ओळख"

By Admin | Published: January 14, 2017 06:42 AM2017-01-14T06:42:14+5:302017-01-14T06:42:14+5:30

‘कबुल है’, ‘हिना’, ‘चंद्रकांता’ या मालिकांमधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता वकार शेख गेल्या दीड-दोन वर्षांपासून शॉर्ट फिल्म्समध्ये

"Short introduction given new identity" | "लघुपटामुळे मिळाली नवी ओळख"

"लघुपटामुळे मिळाली नवी ओळख"

googlenewsNext

‘कबुल है’, ‘हिना’, ‘चंद्रकांता’ या मालिकांमधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता वकार शेख गेल्या दीड-दोन वर्षांपासून शॉर्ट फिल्म्समध्ये काम करतोय. त्याच्या ‘टी स्पून’ या शॉर्ट फिल्मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. त्याच्या आतापर्यंतच्या एकंदरीत करकिर्दीबाबत त्यांने लोकमत सीएनएक्सशी मारलेल्या गप्पा...

कोणत्या प्रकारच्या मालिकांमध्ये काम करायला आवडते?
सध्या मालिका म्हटले म्हणजे लव्हस्टोरी, फॅमिली ड्रामा अशाप्रकारच्या आशयाला प्राधान्य दिले जाते. तसेच मालिकेमध्ये लीड रोल मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. मला मात्र कॉमेडी प्रकारच्या मालिका करायला आवडतात. पण माझ्या चेहऱ्यावरचे गांभीर्य पाहून असे रोल्स कोणी मला आॅफर करतच नाही.
शॉर्ट फिल्मकडे कसा आणि कधी वळलास?
मालिकांमध्ये काम करणे म्हणजे पूर्ण वेळ बांधून घेण्यासारखे असते. शिवाय करियरला मर्यादा येते. त्यामुळे मी एवढ्यावरच न थांबता बॉलिवूड चित्रपटांमध्ये संधी मिळण्यासाठी शॉर्ट फिल्मकडे वळलो. गेल्या दोन वर्षांपासून मी शॉर्ट फिल्म करतोय.
शॉर्ट फिल्ममधून काय साध्य होते असे तुला वाटते?
आतापर्यंत भरपूर शॉर्ट फिल्म केल्या असून त्यात मी मुख्य भूमिका केल्या आहेत. यासगळ्याचा फायदा म्हणजे माझी अभिनय कला विकसित झाली. त्याचबरोबर टी स्पून शॉर्ट फिल्मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला तर ऐतबारला दुबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला. तसेच यशराज बॅनर्सची सब ठिक है ही शॉर्ट फिल्म २०१७मध्ये रिलीज होणार आहे.
तुझा आगामी प्रोजेक्ट काय आहेत?
या वर्षी माझे शेड्यूल खूप बिझी आहे. मी दोन हिंदी चित्रपट साइन केले आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावरील एक ऐतिहासिक शो मी करणार आहे. एक इंग्लिश शॉर्टफिल्मसुद्धा मी या वर्षी करतोय. तसेच मिट्टी या पंजाबी चित्रपटाचा सिक्वल मिट्टी-२मध्ये माझी मुख्य भूमिका आहे.

Web Title: "Short introduction given new identity"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.