कसबा बावडा : नेहमी सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असणाऱ्या कसबा बावडा येथील राजाराम बंधारा ग्रुपच्या वतीने आज पुन्हा एकदा पंचगंगा नदीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदीतील घटस्थापनेचे निर्माल्य दूर करण्यात आले.नुकताच दसरा सण होऊन गेला. अनेकांना वारंवार सांगूनही काहींनी घटस्थापनेचे निर्माल्य, मुर्त्या नदीमध्ये विसर्जित केल्या होत्या. त्यामुळे राजाराम बंधारा येथे नदीचे पाणी भरपूर प्रमाणात प्रदूषण झाले होते. यावर्षी ग्रुपच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की घटस्थापनेचे घट हे नदीच्या पाण्यात न टाकता एका बाजूला ठेवावे.
या आवाहनालाही भरपूर नागरिकांनी प्रतिसाद दिला. तरी पण काही नागरिकांनी न ऐकता नदीमध्ये कचरा केलाच. त्यामुळे पाण्याला प्रचंड प्रमाणात दुर्गंधी व वास येत होता. हा सर्व कचरा ग्रुपच्या वतीने बाहेर काढण्यात आला व नदी स्वच्छ केली.या स्वच्छता मोहिमेमध्ये कविराज राजदीप, हनुमंत सूर्यवंशी, संजय चौगुले ,शिवाजी ठाणेकर, जितू केंबळे, धीरज मोरे, विलास तराळ, सूर्यकांत सुतार, संतोष गायकवाड, दीपक बेडेकर, अस्मिता म्हाकवे, ओमकार म्हाकवे, संग्राम जाधव, रावसाहेब शिंदे, देसाई तसेच राजाराम बंधारा चे इतरही सभासद उपस्थित होते. या अभियानात महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.