शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

हवामान बदलाने आरोग्य बिघडले; वातावरणाचे  ‘समुद्रमंथन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 06:55 IST

हवामान बदलाचा मोठा फटका भारतातील नद्या, नाले आणि इतर जलस्त्रोतावर झाला आहे. मराठवाडा, गुजरात, राजस्थान वगळता देशात सर्वत्र ११७० मिमी पावसाची सरासरी आहे.

प्रा. सुरेश चोपणे 

विसाव्या शतकात लोकसंख्या वाढ, विजेसाठी कोळशाचा वापर, अनेक रसायनांचा वापर सुरू झाला. दुसरीकडे शेतीसाठी, उद्योग आणि विकासाच्या कामासाठी पर्यावरणाचा समतोल राखणारी वने मोठ्या प्रमाणावर तोडली गेली. ह्यामुळे जमिनीचे तापमान वाढले, हरितगृहावर परिणाम झाला, ओझोनला छिद्र पडले, पृथ्वीचे सरासरी तापमान वाढले, ध्रुवावरील बर्फ, ग्लेशिअर्स वितळू लागले, ह्या सर्वांचा परिणाम देशातील जलस्रोत, शेती, पर्यावरण आणि हवामानावर झाला.

अत्याधिक हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला मोठा फटका बसत आहे. उद्योगांनासुद्धा आर्थिक नुकसान सोसावे लागते आहे. आज ह्यामुळे आपली अर्थव्यवस्था ढासळली. पुढेही संकटे वाढणार आहेत म्हणून आजच युद्धपातळीवर हवामान बदल थांबविला पाहिजे. गेले दशक हे अत्याधिक हवामान बदलाचे झाले असून युरोपमध्ये पूर, ऑस्ट्रेलिया, ॲमेझाॅनमध्ये आगी, थंडीच्या, उष्णतेच्या लाटा वाढू लागल्या आहेत. २०२० हे वर्ष महामारी सोबतच गेल्या १०० वर्षांतील तीव्र हवामान बदलाचे वर्ष ठरले. हवामान बदल हा शब्द आज सर्व वैज्ञानिक, राजकीय नेते आणि जनसामान्याच्या तोंडी पडलेला परवलीचा शब्द झाला आहे. जगात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली, पाऊस, ऊन किंवा इतर हवामानात बदल दिसला की क्लायमेट चेंज हा शब्द सर्वांच्या तोंडी सहज येतो. परंतु २५ वर्षांपूर्वी मात्र अनेक बुद्धिवादी लोकसुद्धा ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. जागतिक हवामान विभाग आणि भारतीय हवामान विभागांचा १०० वर्षांचा हवामानाचा इतिहास पाहता (१८८६-१९८६) काही अपवाद वर्षे वगळता हवामान स्थिर राहिले होते. हवामान खात्याने ३० वर्षांचा काळ हा हवामान बदलाचा काळ ठरविला आहे. त्यानुसार १९०१ ते १९३० हा कोरडा काळ १९३१ ते १९६० हा ओला काळ. १९६१ ते १९९० हा पुन्हा कोरडा काळ तर १९९१ ते २०२० हा ओला काळ ठरविला आहे. ह्यात भारताने १९ कोरडे तर १३ ओले दुष्काळ पाहिले आहेत. परंतु ह्या सर्व काळात अत्याधिक हवामान बदलाच्या घटना क्वचितच घडल्या. परंतु १९८६ नंतर हरित वायूंच्या उत्सर्जनामुळे आणि तापमान वाढीमुळे हवामान बदलाला सुरुवात झाल्याचे आकडेवारीवरून कळते.

अत्याधिक हवामान बदल खऱ्या अर्थाने २०१० ते २०२० ह्या दशकात मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसते. भारतासहित जगातही सर्वाधिक तापमानवाढीचे आणि नैसर्गिक आपातीचे हेच दशक ठरले. दर नवीन वर्षे हे मागच्या वर्षाचे उच्चांक मोडीत गेले. ह्याच काळात थंडीच्या आणि उष्णतेच्या लहरींनी उच्चांक गाठला. वादळे, महापूर, भूस्खलन अशा घटना घडल्या. आयपीसीसी आणि युएनईपी ह्या संस्थानुसार १९५०पासून पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत गेले. दर दशकात ते ०.०५ ने वाढले आणि आज ते १.० डी.से.च्या पुढे गेले मागील १००० वर्षांत प्रथमताच २०००, २००५, २०१०, २०१३ आणि पुढील प्रत्येक वर्षे अत्याधिक तापमानाचे वर्षे ठरली. २०१९–२०२० हे वर्ष हे गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक हवामान बदलाचे आणि नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले. अगदी ह्या उलट हीच वर्षे सर्वाधिक थंड वर्षे ठरली, असा अभ्यास नासाच्या गोडार्ट इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस स्टडिजने केला आहे.

हवामान बदलाचा मोठा फटका भारतातील नद्या, नाले आणि इतर जलस्त्रोतावर झाला आहे. मराठवाडा, गुजरात, राजस्थान वगळता देशात सर्वत्र ११७० मिमी पावसाची सरासरी आहे. म्हणजे दरमाणसी ६१,००० क्युबिक फुट इतके पाणी वाट्याला येते. परंतु ह्यातील बहुतेक पाणी समुद्रात वाहून जाते. हवामान बदलाचा सर्वाधिक तडाखा मानवाच्या आरोग्यास बसला आहे. रोगराई प्रचंड वाढल्याचे जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीवरून कळते. निसर्ग आता आपले विक्राळ रूप धारण करीत असून आपला नाश करू पाहत आहे. आजच सावध होऊन आपण निसर्ग संरक्षणाचे उपाय केले नाही, तर सर्वनाश निश्चित आहे.

(लेखक ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :environmentपर्यावरण