शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

World Environment Day: कांदळवनांचा ऱ्हास शहरांच्या विनाशास कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 1:22 AM

समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे.

कांदळवने ही निसर्गाने पृथ्वीला दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. पृथ्वीवरील सजीवांसाठी प्राणवायू निर्माण करण्यासोबतच ती प्रदूषित पाण्यालाही स्वच्छ करतात. वातावरणातील वाढलेला कार्बन शोषून घेऊन ही कांदळवने मासे, झिंगे, खेकडे यांना खाद्य तसेच सुरक्षाकवच पुरवितात. वादळासारख्या आपत्तींमध्ये तर कांदळवने चक्क ढाल बनून वादळाचा आवेग कमी करण्याचे तसेच त्यांना आत येण्यापासून रोखण्याचे काम करतात. एवढे सर्व करूनही माणूस मात्र ‘विकासाच्या’ नावाखाली या कांदळवनांचा सतत ºहासच करीत राहिला.

आमची समुद्री परिसंस्था व किनाºयावरील जैवविविधता सध्या अनेक गंभीर धोक्यांचा सामना करीत आहे. कांदळवनांसोबतच समुद्री प्रवाळ, किनाºयावरील पाणथळ जागा यांच्यावरही माणसाने आज आक्रमण केले आहे. हवामान बदलामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होणे, समुद्राच्या पाण्याच्या आम्लधर्मात बदल होणे व समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढणे, यासारख्या भयावह गोष्टी घडून आल्या आहेत. त्यामुळे आज पृथ्वीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून आता आमच्या परिसंस्थांच्या होणाºया ºहासावर पूर्णत: निर्बंध लादले पाहिजेत.

या परिसंस्थांची बिघडलेली स्थिती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागेल. समुद्री किनाºयावर ºहास झालेल्या जागी कांदळवनांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी लागेल. समुद्री किनाºयावर येऊ घातलेल्या विकास प्रकल्पांवर आता निर्बंध घातले पाहिजेत. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणाºया वाढीकडे पूर्णत: दुर्लक्ष करून प्रस्तावित केलेले नवी मुंबई विमानतळ, मुंबईचा समुद्री किनाºयालगतचा महामार्ग (कोस्टल रोड), भुयारी मेट्रो-३ प्रकल्प या घातक प्रकल्पांवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.            -देबी गोएंका,कार्यकारी ट्रस्टी,  कॉन्झर्व्हेशन एक्शन ट्रस्ट, मुंबई

टॅग्स :World Environment DayWorld Environment Dayenvironmentपर्यावरण