- श्रीकिशन काळे
पुणे : देशात महाराष्ट्राने फुलपाखराला पहिल्यांदा राज्य फुलपाखराचा दर्जा दिला. आता देशाचे राष्ट्रीय फुलपाखरू ठरविण्यासाठी अभ्यासक सरसावले आहेत. यासाठी निवडणूक घेतली जात आहे. लोकांना सातपैकी एका फुलपाखरास मत देता येईल. यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंत मत नोंदविता येणार आहे.निवडणुकीसाठी अभ्यासक आणि राज्य जैवविविधता मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सर्वाधिक मते पडणारे फुलपाखरू ‘राष्ट्रीय फुलपाखरू’ म्हणून जाहीर करण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.- सप्टेंबर हा फुलपाखरू महिना म्हणून साजरा केला जातो. नागरिकांनी फुलपाखरांविषयी जाणावे, त्यांचे संवर्धन करावे, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.- येथे नोंदवा मत । https://forms.gle/kLrXD5AouN4VeSUC9
सध्या लॉकडाऊन असल्याने आम्ही वेबिनारद्वारे याविषयी चर्चा करून उपक्रम सुरू केला आहे. फुलपाखरांची अधिक वाढ व्हावी आणि नागरिकांनी त्यांना जपावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचाच हा एक भाग आहे.- डॉ. विलास बर्डेकर, फुलपाखरू संशोधक, माजी अध्यक्ष, राज्य जैवविविधता मंडळ