शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

World Environment Day : पर्यावरणाची अधोगती ठरतेय घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 10:17 AM

एकेकाळी दंडाकारण्य अशी ओळख मिरविणाऱ्या नाशिकची अवस्था मागील वीस वर्षांत इतिहासजमा झाली. जमिनीची धूप आणि तापमान वाढत गेले. पर्जन्यमानाचा समतोलही बिघडला अशा अनेक पर्यावरणीय समस्यांना दुर्दैवाने नाशिककरांनाही आता तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाची अधोगती रोखण्यासाठी नागरिकांनी स्वार्थी विचार बाजूला सारणे गरजेचे आहे.

अझहर शेख

नाशिकनाशिकच्या हवामानापासून तर गोदावरी नदीपर्यंत या मागील वीस वर्षांमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येतो. हवामान तज्ज्ञांच्या मते नाशकात या वीस वर्षांमध्ये हवेची गुणवत्ता अधिकाधिक खराब होत गेली. तसेच वायू, ध्वनी प्रदूषणातही भर पडली. जल तज्ज्ञांच्या मते जलप्रदूषण रोखण्यास या कालावधीत नाशिककरांसह यंत्रणा अपयशी ठरली.

नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर गोदावरीचे  उगमस्थान असून नाशिकचे अस्तित्व व ओळख देशभरात ज्या गोदावरीमुळे आहे, त्या गोदावरीची घुसमटदेखील जन्मस्थळापासूनच सुरू होते. गोदावरी प्रदूषण थेट न्यायालयात पोहचले असले तरीदेखील शासकिय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना गोदावरी नदी संवर्धनाबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत या मागील वीस वर्षांत फारसे यश आलेले नाही. परिणामी गोदेची अवस्था तर बिकट होतच गेली मात्र तिच्या उपनद्याही संकटात सापडल्या. सर्रासपणे शहरातील मैला वाहून नेणारी मलवाहिनी अशी सध्या गोदावरीची अवस्था झाली आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही.

जैवविविधता विकसित होत असताना वाढत्या शहरीकरणांतर्गत होणाऱ्या रस्ते विकासांमुळे येथील निसर्गाला हानी पोहचण्यास सुरुवात झाली. मागील पंधरा वर्षात यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले. निसर्गाची हानी रोखण्यासाठी शाश्वत विकासाची कास धरण्यास शासकिय व राजकिय इच्छाशक्ती अपुरी पडली. गावाबाहेरील खुरट्या जंगलात राहणारा बिबट्या आता शहराजवळील मळे भागात ऊसशेतीत आश्रयाला आला अन् शेवटी दोषीही तोच ठरविला जातो, अशी खंत वन्यजीवप्रेमी वैभव भोगले यांनी व्यक्त केले.

वीस वर्षांपुर्वी शहराच्या अवतीभोवती वृक्षराजी बहरलेली दिसत होती ती आता बरीच नाहीसी झाली आहे. शहालगत जंगलांची वाढ चांगली होती. शेतीचा हरित पट्टाही प्रचंड विस्तारलेला दिसत होता. सिमेंट-कॉँक्रीटचे जंगल मर्यादित होते. सीबीएस ते मुंबईनाक्यापर्यंतचा परिसरसुध्दा त्यामुळे शहराचे तापमान उन्हाळ्यात कधीही ३७अंशाच्या पुढे सरकले नाही; मात्र मागील सहा ते सात वर्षांमध्ये या तापमानाने चाळीशीही पार केल्याच्या नोंदी आहेत. नुसती हिरवळ आणि पर्यावरणपुरक वृक्षांची लागवड यामध्ये फरक आहे, हा फरक जोपर्यंत समजून घेतला जात नाही, तोपर्यंत जमिनीची धूप कमी होऊन  पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही, असे मत वृक्ष अभ्यासक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

सन २००० ची स्थिती

१. २००५ सालानंतर पर्ज्यन्यमान शहरासह जिल्ह्यात घसरले.

२. शहर व जिल्ह्यातून निसर्गाचा सफाई कामगार गिधाड नाहीसा झाला.

३. गोदाकाठी तसेच शहराच्या अवतीभोवती समृध्द पक्षीजीवन पाहावयास मिळत होते.

४.२०१२ पासून सातत्याने उन्हाळ्यात कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार सरकला.

५.मलनिस्सारण केंद्रांची संख्या तोकडी आणि अवस्था बिकट. परिणामी गोदा प्रदूषणाचा स्तर उंचावला.

६. २००५ साली एफएसआयच्या अहवालानुसार जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७.१८ टक्के वनाच्छादन होते.

सध्याची स्थिती

१. २०१७ सालापासून पर्जन्यमानात काहीशी सुधारणा झाली; मात्र असमतोल जैसे-थे.

२. २०१२ सालापासून जिल्ह्यात गिधाडे पुन्हा दिसू लागली.

३. पक्ष्यांना निवारा व खाद्य देणारी वृक्ष प्रजाती कमालीची घटल्याने पक्षीजीवन धोक्यात आले.

४. गेल्या सात वर्षातील सर्वाधिक ४२.८ इतक्या तापमानाची नोंद मागील वर्षी झाली तर यंदा १५ एप्रिल रोजी ४०.५ अंश तापमान नोंदविले गेले.

५. नवीन मलनिस्सारण केंद्र अस्तित्वात आले; मात्र जुनाट यंत्रणा जैसे-थे.

६. २०१७-२०१९ सालचा एफएसआयने यावर्षी प्रसिध्द केलेल्या अहवालात एकूण वनाच्छादन केवळ ६.९३ टक्के आहे. २०१७ साली ८.५५ टक्के इतके होते.गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास अद्याप  यश आलेले नाही तर तीच्या उपनद्यांच्या अवस्थेबाबत न बोललेलेच बरे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासकिय धोरणांचा अभाव प्रकर्षाणे जाणवतो. मागील वीस वर्षांत नदीकाठालगत झालेला एकतर्फी विकास पर्यावरणाला हानीकारक ठरत आहे. गोदावरीच्या उगमस्थानापासूनच तीची घुसमट सुरू होते, हे दुर्दैवच

- डॉ. प्राजक्ता बस्ते, नदी अभ्यासक

टॅग्स :World Environment DayWorld Environment DayNashikनाशिकpollutionप्रदूषणgodavariगोदावरीenvironmentपर्यावरण