शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

गोदा पुनर्जीवित आयडिया लंडनमध्ये प्रदर्शित; 'डिझाइन बिनाले' या जागतिक प्रदर्शनात स्थान!

By अझहर शेख | Published: June 22, 2021 7:27 PM

गोदा प्रोजेक्टतंर्गत पहिल्या टप्प्यात दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीपासून काँक्रीट काढण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या सहाय्याने काँक्रीट उध्दवस्त करण्यात आल्याने गोदावरीचा श्वास मोकळा होऊ लागला. यामुळे नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत तर मोकळे होण्यास मदत झाली; मात्र पुराची तीव्रताही यामुळे कमी होणार असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन५०देशांमधून १५९ पर्यावरणस्नेही प्रकल्पांना स्थान

नाशिक :पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचे मुलभूत बदल घडवून आणणाऱ्या संकल्पना आणि प्रकल्पांवर अधारित लंडनसारख्या देशात होत असलेल्या यंदाच्या जागतिक 'डिजाइन बिनाले' या प्रदर्शनामध्ये नाशिकच्यागोदावरी पुनर्जीवित प्रकल्पाला स्थान देण्यात आले आहे. काँक्रीट मुक्त गोदावरी प्रकल्पाबाबतचा संशोधन अहवाल सचित्र या प्रदर्शनात झळकल्याने नाशिककरांसाठी नव्हे तर संपुर्ण राज्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.डिझाईन बिनाले या जागतिक स्तरावरील प्रदर्शन येत्या २७ तारखेपर्यंत सुरु राहणार आहे. कोव्हिड-१९मुळे यंदा प्रदर्शन ऑनलाइन संकेतस्थळाद्वारे भरविले गेले आहे. 'शुध्द हवा, पाणी, भूमी, उर्जा आणि वने' अशी या प्रदर्शनाची यंदाची संकल्पना आहे. गोदावरी स्वावलंबी करण्यासाठी तिचे नैसर्गिक जलस्त्रोत पुन्हा खुले करावे लागणार आहे. गोदावरीचे नैसर्गिक जलस्त्रोत हे जीवंत आहे; मात्र काँक्रीटीकरणाखाली ते दाबले गेल्यामुळे नदी मृतावस्थेत पोहचल्याचा निष्कर्ष नदी अभ्यासक डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी त्यांच्या संशोधन अहवालातून मांडला होता.

याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जानी यांनी दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने २०१७साली दिलेल्या आदेशान्वये मनपा प्रशासनाने स्मार्टसिटीच्या गोदा प्रोजेक्टतंर्गत पहिल्या टप्प्यात दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीपासून काँक्रीट काढण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या सहाय्याने काँक्रीट उध्दवस्त करण्यात आल्याने गोदावरीचा श्वास मोकळा होऊ लागला. यामुळे नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत तर मोकळे होण्यास मदत झाली; मात्र पुराची तीव्रताही यामुळे कमी होणार असल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. नदी संवर्धनासाठी ही संकल्पना अत्यंत महत्वाची ठरल्यामुळे बस्ते यांनी याबाबत केलेले संशोधन इंग्लंडच्या पर्यावरण संस्थेने भरविलेल्या प्रदर्शनाकरिता सादर केले. त्यांच्या बंगळुरुमधील चमुने या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर या प्रदर्शनात नाशिकच्या गोदावरी पुनर्जिवीत करण्याची आयडीया झळकली.५०देशांमधून १५९ पर्यावरणस्नेही प्रकल्पांना स्थान५० देशांमधून पर्यावरणपुरक असे प्रकल्पांची मागणी यासाठी करण्यात आली होती. १५९प्रकल्पांची यामध्ये निवड केली गेली. या प्रदर्शन पर्यावरण संवर्धनाबाबत शाश्वत विकासातून मुलभूत बदल घडविणाऱ्या प्रकल्पांना स्थान दिले जाते. हे प्रदर्शन २०१६साली सर जॉन सोरेल आणि बेनई व्हांश यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक व्यासपीठ म्हणून सुरु केले. इंग्लंडमधील काही पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत या प्रदर्शनाची सुरुवात झाली आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पध्दतीने नदी संवर्धनाबाबत केलेला अभ्यास आणि मांडलेल्या संशोधन अहवालाला थेट जागतिक स्तरावरील प्रदर्शनात स्थान मिळणे ही बाब माझ्यासाठी नक्कीच समाधान देणारी आहे. नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी पुनर्जिवित करणारी ही संकल्पना नक्कीच नदी संवर्धनाकरिता मुलभूत बदल घडविणारी ठरेल याचा विश्वास वाटतो.- डॉ.प्राजक्ता बस्ते, नदी अभ्यासक, नाशिक-- 

टॅग्स :NashikनाशिकgodavariगोदावरीNashik Floodनाशिक पूरLondonलंडनenvironmentपर्यावरणforestजंगलair pollutionवायू प्रदूषण