शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

World Environment Day: तनमोर व माळढोक संवर्धनासाठी अखेरची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 1:04 AM

राजस्थान व गुजरात राज्यांमधील खाजगी व महसुली जमिनींवरील गवती माळरानांची ‘पडीत’ अशी अवहेलना करून त्यावर आता सौर प्रकल्प येऊ पाहत आहेत.

जागतिक पर्यावरणदिनी देशातील गवती माळराने अखेरच्या घटका मोजत आहेत. समृद्ध गवती माळरानांचे प्रतीक समजले जाणारे तनमोर व माळढोक हे पक्षी आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. साधारण दीडशेच्या घरात उरलेले माळढोक पक्षी व ७०० च्या आसपास असलेले तनमोर संपायला किती महिने लागतील, हे मोजणे आता सुरु झाले आहे. भारताने या शतकात काय गमाविले याच्या यादीत स्थान पटकाविण्यास या दोन पक्षी प्रजाती आता सज्ज आहेत. त्यांच्या गवती माळरानांच्या संवर्धनासाठी तातडीने योजना आखली तरच या पक्षी प्रजाती नामशेष होण्यापासून वाचू शकणार आहेत.

राजस्थान व गुजरात राज्यांमधील खाजगी व महसुली जमिनींवरील गवती माळरानांची ‘पडीत’ अशी अवहेलना करून त्यावर आता सौर प्रकल्प येऊ पाहत आहेत. या माळरानांवर उभारलेल्या विद्युत वाहिन्यांना धडकून आकाराने ड्रोनपेक्षाही मोठे असणारे अनेक माळढोक पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. महत्त्वपूर्ण माळरानांवरील या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे किंवा बाहेरून वळविणे सहज शक्य आहे. या माळरानांवर किंवा आसपास अनिर्बंध गुरेचराई, कीटकनाशकांचा अति वापर, भटकी कुत्री, शेतीसाठी होणारी अतिक्रमणे यापासून या अधिवासांना वाचविणे मंगळावर स्वारी करणाºया माणसासाठी अशक्य मुळीच नाही. अशा उपाययोजना झाल्यास त्यांचे प्रजनन केल्यानंतर तयार होणाºया माळढोक संख्येस खुले सोडता येणार आहे, हे ध्यानात घेऊन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. ही भारतासाठी शेवटची संधी असणार आहे.    -केदार गोरे,संचालक, कोर्बेट फाऊंडेशन व माळरानांवरील पक्ष्यांचे संरक्षक

टॅग्स :World Environment DayWorld Environment Dayenvironmentपर्यावरण