शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

लोकमत पर्यावरणोत्सव; मुंबई देणार हवेची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 9:37 PM

लोकांना हवा प्रदूषणाचा आपल्या शरीरावर तसेच श्वसनक्रियेवर होणारा परिणाम सहजरीत्या लक्षात येईल.

मुंबई : आपण कुठल्या गुणवत्तेच्या हवेत श्वास घेतोय? हा प्रश्न जर का तुम्हाला पडत असेल तर याच उत्तरही तुम्हाला लवकरच मिळेल. मुंबईत यासंदर्भात जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, मोठ्या आकाराची फुफ्फुसे वर्दळ असलेल्या रस्त्याच्या शेजारी लावण्यात आली आहेत. वाहनांमुळे व धुळीमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाची भीषणता या फुफ्फुसांच्या रंग बदलण्यावरून आपल्याला समजून येणार असून, या माध्यमातूनच मुंबई हवेची परिक्षा देणार आहे.

फुफ्फुसांच्या स्थापनेमुळे लोकांना हवा प्रदूषणाचा आपल्या शरीरावर तसेच श्वसनक्रियेवर होणारा परिणाम सहजरीत्या लक्षात येईल. ही कृत्रिम फुफ्फुसे १४ जानेवारी रोजी वातावरण आणि झटका या पर्यावरणावर काम पाहणाºया संस्थाद्वारे,  प्रत्येक श्वास महत्वाचा आहे असे म्हणणारा हा  बिलीबोर्ड व त्यावरील फुफ्फुसे वांद्रे येथील आर.डी.नॅशनल कॉलेजच्या बाहेर वर्दळ असलेल्या भागात रस्त्याशेजारी लावली आहेत.

सद्यस्थितीत पांढरी दिसणारी ही फुफ्फुसे बनवण्यासाठी हेपा फिल्टर्स वापरण्यात आले आहेत. हे फिल्टर्स ऑपरेशनसाठी, मास्क बनवण्यासाठी व धूळ पकडण्यासाठी वापरले जातात. या फुफ्फुसांच्या मागे पंखे जोडले गेले आहेत. जे हवा खेचून घेतात. ज्यामुळे संपूर्ण बिलीबोर्ड खºया फुफ्फुसाचा आभास तयार करतो. पुढील काही दिवसात हे फिल्टर्स हवेतील, वाहनातून निघणारे  धुलीकण, पार्टिक्युलेट कण पकडण्यास सुरुवात करतील. त्यामुळे या कृत्रिम फुफ्फुसांचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. प्रदूषणामुळे या फुफ्फुसांचा रंग काळा होईल. बिलीबोर्डवर फुफ्फुसांबरोबर एक डिजिटल एयर क्वालिटी मोनिटरही बसवण्यात आला आहे. या यंत्राद्वारे हवेच्या दर्जावर मिनिट टू मिनिट लक्ष ठेवण शक्य होते.

दरम्यान, जेव्हा २ वर्षांपूर्वी आम्ही हा बिलबोर्ड बंगळुरूमध्ये लावला तेव्हा आम्हाला लोकांकडून फार चांगला प्रतिसाद मिळाला. फुफ्फुसे काळी पडताना बघून लोकांमध्ये एक भीती निर्माण होते. समस्येची गंभीरता लक्षात येऊन त्याविरुद्ध जनजागृती पसरवण्यास मदत होते. मुंबईमध्ये प्रदूषणाची पातळी भयंकर वाढली आहे म्हणूनच अशा प्रकारचे उपक्रम राबवून लोकांमध्ये तसेच सरकारलाही जाग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे झटका या संस्थेचे म्हणणे आहे.विषारी हवेत राहण्याचे दूरगामी परिणाम फार घातक आहेत. जे पिढ्यानपिढ्या आपल्याला दिसू शकतात. संशोधनातून समोर आले आहे कि गरोदर बायकांमध्ये हवा प्रदूषणामुळे त्यांचा अर्भकांच्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे त्यांच्या  पुढील पिढीमधील नातू पणतूही अस्थमाचा त्रास दिसू शकतो. हवा प्रदूषण किती भयंकर आहे हे आपल्याला यावरून लक्षात येईल. आपल्याला हवा प्रदुषणासंदर्भात संवाद चालू ठेवला पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती तयार होण्यास  मदत होईल.

- डॉ. संजीव मेहतामुंबईमध्ये पी.एम. २.५ पातळी जास्त आहे. श्वासांच्या आजारांव्यातिरिक्त हृदयाचे आजार, हृदयविकाराचा  झटका, फुफ्फ्सांचा कर्करोग अशा अनेक आजारांचा धोका हवा प्रदूषणामुळे संभवतो. त्याचप्रमाणे त्वचेचे आजार, मानसिक त्रास व आजाराचा धोकाही संभवतो.- डॉ. अमिता नेने, विभाग प्रमुख, श्वसन विभाग, बॉम्बे रूग्णालयया उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट राज्य सरकारचे हवा प्रदूषण या प्रश्नावर लक्ष वेधून, या समस्येचा समावेश सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये करणे हे आहे.- भगवान केशभट, संस्थापक, वातावरण संस्था

टॅग्स :environmentपर्यावरणMumbaiमुंबईpollutionप्रदूषणMaharashtraमहाराष्ट्रLokmatलोकमत